How to Check Heart Health at Home : आजच्या काळात, लोकांना लहान वयातच हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकवेळा गंभीर परिस्थिती उद्भवल्यानंतर लोक डॉक्टरांकडे जातात. अशा स्थितीत लोकांना असे वाटते की, जर आपल्याला आपल्या हृदयाशी संबंधित समस्या वेळेवर घरी कळल्या असत्या तर उपचार करणे खूप सोपे झाले असते. तुम्हालाही असे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरीच हृदयाशी संबंधित समस्या जाणून घेऊ शकता. या स्थितीत तुम्हाला हृदयाच्या आरोग्याविषयी वेळेत कळू शकेल. त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू होऊ शकतात. 


रक्तदाब तपासणी मशीन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्या गॅजेट्सच्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमचा पल्स रेट तपासू शकता. ज्याद्वारे तुम्ही सहजपणे रक्तदाब तपासू शकता. तुम्ही घरच्या घरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मशीन आणू शकता आणि दिवसातून 2 ते 3 वेळा तुमचा ब्लड प्रेशर तपासू शकता, याद्वारे तुम्हाला हृदयाच्या आरोग्याविषयी बऱ्याच अंशी माहिती मिळू शकेल. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोनदा रक्तदाब तपासू शकता, जसे की सकाळी 8 आणि 8.5 आणि संध्याकाळी 8 ते 8.5.


आय वॉच 


डॉक्टर सांगतात की, या व्यतिरिक्त इतर अनेक मेडिकल गॅजेट्स जसे की आय वॉच बाजारात उपलब्ध आहेत. तुमचा ईसीजी दाखवण्यासोबतच तुमच्या हृदयाच्या गतीशी संबंधित माहिती देते. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास, ते आपल्याला सतर्क करते.


प्लस ऑक्सीमीटर


पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने तुम्ही तुमच्या हृदयाच्या गतीबद्दल माहिती मिळवू शकता. तसेच, तुमचा श्वास किती चांगला आहे, हेही त्यातून कळू शकते. त्यामुळे हृदयरोगींनीही घरात पल्स ऑक्सिमीटर ठेवणे गरजेचे आहे.


वेट मशिन 


यासोबतच तुम्हाला आधीच हृदयविकार असेल तर तुम्ही वेळोवेळी तुमचे वजनही तपासावे. यासाठी तुम्ही तुमच्या घरात डिजिटल वजन तपासण्याचे यंत्र ठेवावे. जर तुमचे वजन दररोज 500 ग्रॅमपेक्षा जास्त वाढत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)