तंबाखूचं सेवन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, `या` राज्यात सर्वाधिक वापर
India Larget Tobacco Using : भारत एक विकसनशील देश आहे. जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे. पण त्याचबरोबर व्यसानाच्या बाबतीतही भारत पुढे चालला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
India Larget Tobacco Using : जगात सर्वात जास्त तरुणवर्ग भारतात आहे. पण हाच तरुणवर्ग व्यसनाच्या (Addiction) विळख्यात अडकलाय. आपल्या देशात तंबाखू (Tobacco) सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तंबाखू खाणं आरोग्यास हानीकारक आहे, असा इशारा दिला जातो. पण यानंतरही तंबाखूजन्य पदार्थांचा वापर वाढत चालला आहे. जगात तंबाखूचं सेवन करण्यात दुसरा क्रमांक भारताचा (India) लागतो. केपीएमजी इन्शुरन्स अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेज एलएलपीने तयार केलेल्या एका अहवालात ही चिंताजनक बाब समोर आली आहे. खैनी, गुटखा, सुपारी, तंबाखू, जर्दा, बिडी, सिगरेट आणि हुक्का सारख्या उत्पादनांच्या सेवनात मोठी वाढ झाल्याचं या अहवालात नुमद करण्यात आलं आहे.
भारतात धु्म्रपान किंवा तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनने दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू होता. या आकडेवारीत गेल्या 30 वर्षात 58.9 टक्के वाढ झाली आहे. भारतात तम्बाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे 1990 मध्ये सहा लाख लोकांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये हाच आकडा वाढून 10 लाखांवर पोहोचला आहे.
आता डब्लूएचओ द्वारे जाहीर केलेल्या अहवालात जगभरात तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी जवळपास 105.4 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचं समोर आलं आहे. हा खर्च तंबाखूमुळे आजारा पडलेल्या लोकांच्या उपचारांवर खर्च होत आहे. देशात तंबाखूच सेवन करण्यात मिझोरम हे राज्य पहिल्या स्थानावर आहे. मिझोरममध्ये तब्बल 67 टक्के लोकं तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात. तर सर्वात कमी म्हणजे 9 टक्के तंम्बाखूचा वापर गोव्यात होतो.
अहवालानुसार महिलांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ झाली आहे. प्रत्येक सहावी महिला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचं सेवन करते. अनेक महिला मजूर गुटखा, खैनी, विडी यांचं सेवन करतात तर काही महिला सिगारेट ओढणे, गुटखा खाणं स्टेटस म्हणून सुरु करतात आणि त्यानंतर व्यसनाला बळी पडतात.
तंबाखूचे दुष्परिणाम
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने माणसाच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. यात सर्वात मोठा धोका असतो तो कॅन्सर अर्थात कर्करोगाचा. तंबाखूमुळे तोंडाचा, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचं भीती असते. यापैकी भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचं प्रमाणही वाढतंय. तंबाखूमुळे छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्याचे विकार इत्यादी रोग जडतात. धूम्रपानामुळे टी बी सुद्धा होऊ शकतो.