ताप, सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा; `हा` आजार असेल तर 3 महिन्यानंतर मृत्यू, लॅन्सेटचं संशोधन
Health News Marathi : ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे जर अशी काही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. त्यामध्ये असा आजार झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मृत्यूची शक्यता आहे.
Chikungunya infection News In Marathi : अनेकदा पावसाळा असो किंवा हिवाळा या ऋतुमध्ये सर्दी, खोकलाा यांसारखे आजार सामान्य वाटता. हवामानानुसार सर्दी आणि फ्लूसारखे काही आजार सहज बरे होतात. पण डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या काही आजारांवर वेळीच उपचार केले नाही तर मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान आफ्रिकन देशातील टांझानियामध्ये चिकुनगुनिया हा सर्वात सामान्य आजार आहे. त्यानंतर रोगाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातच आता चिकुनगुनियाची लागण झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यानंतर 10 ते 15 दिवस नव्हे तर तीन महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका असतो, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे चिकुनगुनिया झालेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोरोना विषाणूप्रमाणेच चिकुनगुनिया हा आजार असून तो विषाणूंपासून याचा संसर्ग होतो. गेल्या काही वर्षांपासून चिकनगुनिया हा सार्स, बर्ड फ्लू, डेंग्यू इत्यादी आजारांच्या पंक्तीतच येऊन बसला आहे. चिकुनगुनिया हा एडिस प्रजातीच्या डासांद्वारे पसरणाऱ्या विशिष्ट विषाणूमुळे होणारा आजार आहे. सलग दोन-तीन दिवस ताप, डोके दुखणे, विशेषत: पाठ, पोट, कंबर या भागांवर पुरळ आणि हातापायांचे सांधे दुखू लागतात.
चिकनगुनियाची लक्षणे
हा आजार सांध्यातील वेदना, अचानक ताप येणे आणि थरथरणेपासून सुरुवात होते. या व्यतिरिक्त रुग्ण स्नायू दुखणे, थकवा आणि मळमळ, डोकेदुखी, पुरळ आणि सांधेदुखीची तक्रार करतो. या वेदना चिकनगुनिया ताप बरा झाल्यानंतरही कायम राहतात.
नेमकं काय म्हणतात लॅन्सेटचं संशोधन?
या संशोधनात ‘द लॅन्सेट संसर्गजन्य रोग’या अहवालात प्रसिद्ध झालेल्या, चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो डासांनी चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. याला शक्यतो पिवळा ताप ही म्हणतात. तसेच बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात, परंतु चिकुनगुनिया हा आजार अजूनही प्राणघातक ठरू शकतो. संसर्गाची बहुतेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत, परंतु 2023 मध्ये, जगभरात सुमारे पाच लाख लोकांना चिकुनगुनियाची लागण तर 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तीव्र संसर्गाच्या कालावधीनंतर लोकांना गुंतागुंत होण्याचा धोका असतो. तीव्र संसर्गाचा कालावधी लक्षणे दिसल्यानंतर 14 दिवसांचा असतो. तसेच पहिल्या आठवड्यात संक्रमित व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आठ पटीने जास्त असतो. तसेच संसर्ग झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत संक्रमित व्यक्तीकडून गुंतागुंत होण्याचा धोका दुप्पट होतो.
चिकनगुनियाची कारणे
चिकुनगुनियाचा विषाणू संक्रमित डासांच्या चाव्यामुळे पसरतो. चिकुनगुनिया विषाणूने पीडित व्यक्तीला आपोआप संसर्ग होतो. चिकनगुनिया विषाणूला 'सायलेंट' संसर्ग म्हणून ओळखले जाते.
चिकुनगुनियावर उपचार काय?
चिकुनगुनियावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही आणि काही औषधांनी लक्षणे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकरणात, नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे वेदना कमी करण्यास मदत करतात. अँटीव्हायरल औषधे जसे की एसायक्लोव्हिर (डॉक्टरांच्या सल्ला घ्या) दिली जातात. तसेच, अधिक द्रव पिणे हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.