Avoid These Foods Early Morning: सकाळी उठल्यावर आपल्याला अनेक पदार्थ खाण्याची (Early Morning Food) हौस असते. कधी जंग फूड तर इतर काही. खरंतर सकाळी उठल्यावर काही गोष्टी आपल्या पोटात जाणं अत्यंत गरजेचे असते. आपल्या पोटाला सकाळी उठल्या उठल्या काहीतरी खावसं वाटतंच कारण आपल्याला तेव्हा जोरात भुक (Breakfast) लागलेली असते. असं म्हटलं जातं की आपण सकाळी जे खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तळलेले पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो आणि त्यानं तुमची तब्येत बिघडू शकते. इतकेच नाही तर आपलं वजनही वाढू शकते. त्यामुळे अशा गोष्टी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर तसेच मनावर घातक (Impact on Physical and Mental Health) परिणाम होऊ शकतो. आणि यात सातत्य आलं तर त्याचा वाईट परिणामही आपल्या शरीरावर होयला लागतो. (health news stop eating these kind of food early morning with empty stomach otherwise you face bad impact)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला माहितीये का की सकाळी आपल्याला खाताना काही पथ्यंसुद्धा (Precuration) पाळावी लागतात. त्यामुळे आपल्याला सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी न खाणं आवश्यक आहे. सकाळी तुम्ही अशा गोष्टी खाऊन तुमच्या शरीरावर विचित्र परिणाम करून घेऊ शकता. तेव्हा जाणून घ्या की नक्की ते कोणते पदार्थ आहेत ज्यांना तुम्हाला रिकाम्या पोटी (Early Morning Diet) सकाळी खाणं टाळणं कधीही योग्य ठरेल. 


सकाळी रिकाम्या पोटी 'या' गोष्टी खाऊ नका


1. कॉफी किंवा चहा (Coffee and Tea)
सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा किंवा कॉफी पिऊ नका. 
जर तुम्हाला अजूनही चहा किंवा कॉफी प्यायची असेल तर तुम्ही त्यासोबत पराठा, ब्रेड किंवा बिस्किटे खावीत नाहीतर तुम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो. 


2. सलाड (Salad)
फिटनेसमुळे बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी सॅलड खाण्यास सुरुवात करतात पण सॅलड खाण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारचे जेवण. 
त्यामुळे तुम्ही जर सकाळी रिकाम्या पोटी कोशिंबीर खात असाल तर चुकूनही त्याचे सेवन करू नका कारण असे केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.


3. सफरचंद (Apple)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. 
कारण सफरचंद पचायला 1 किंवा 2 तास लागतात.
सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो. 


4. लस्सी (Lassi)
अनेकांना सकाळी रिकाम्या पोटी लस्सी पिणे आवडते. 
पण असे केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)