बाजारात फळं खरेदी करताना आपण अनेकदा सफरचंद (Apple), संत्रा (Oranges), पेर या सारख्या फळांवर स्टिकर लावलेले दिसतात. स्टिकर (Stickers) लावलेली फळं ताजी, महागडी आणि बेस्ट क्वालिटीची असतात असा साधारण आपला समज असतो. स्टिकर नसलेली फळं घेतली की ती खराब किंवा हलक्या क्वालिटीची असतील असं ग्राहकांना वाटतं. अनेकवेळा दुकानदार स्टिकर लावलेली फळं एक्स्पोर्ट क्वालिटीची आहेत, त्यामुळे ती महागडी असल्याचं आपल्याला सांगतात. चमकदार फळांवर चमकदार स्टिकर्स पाहून ग्राहकांनाही दुकानदाराच्या सांगण्यावर विश्वास वाटतो. फळांवरचा खराब झाकण्यासाठी स्टिकर लावला जातो, असाही ग्राहकांचा समज आहे. पण बेस्ट क्वालिटी किंव खराब भाग झाकण्यासाठी स्टिकर लावले जात नाहीत. तर यामागचं कारण वेगळच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फळांवर स्टिकर्स का लावतात?
फळांवर स्टिकर्स लावलेली फळं आपण खरेदी करतो, पण यावर लिहिलेल्या गोष्टी कधीच वाचल्या जात नाहीत. हेच कारण आहे की 99 टक्के लोकांना फळांवर स्टिकर्स का लावले जातात याचं कारण माहित नाही. वास्तविक या स्टिकर्स संबंध क्वालिटी किंवा किंमतीश नाही तर थेट आपल्या आरोग्याशी आहे. त्यामुळे ज्यावेळी तु्म्ही सफरचंद किंवा संत्री सारखी फळं विकत घेता त्यावेळी स्टिकर्सवर लिहिलेला मजकूर नक्की वाचा.


फळांवरच्या स्टिकर्सचा अर्थ
फळांवर चिटकवण्यात आलेल्या स्टिकर्सवर त्या फळाची किंमत आणि एक्सपायरी डेट याशिवाय पीएलयू म्हणजे Price look-up code लिहिलेला असतो. हा कोड फळांच्या क्वालिटीशी संबंधीत आहे. हे फळ कसं पिकवण्यात आलं आहे हे या कोडद्वारे सांगितलं जातं. पीएलयचे तीन प्रमुख कोड असतात. 


4 अंकाने सुरु होणारा कोड
काही फळांवर चिकटवण्यात आलेल्या स्टिकर्सवर चार अंकी संख्या लिहिलेली असते. याची सुरुवात 4 अंकाने होते. उदाहरणार्थ 4026, 4987... या अंकांचा अर्थ ही फळं कीटकनाशकं आणि रासायनिक पद्धतीने पिकवलेली आहेत. यात कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ही फळे सर्वात स्वस्त असतात.  याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही खते आणि कीटकनाशके असलेलं फळ खरेदी करत आहात.


8 अंकांनी सुरु होणारा कोड
काही फळांवर चिकटवण्यात आलेल्या स्टिकर्सवर पाच अंकी संख्या लिहिलेली असते. या कोडची सुरुवात 8 अंकांनी होते. उदाहरणार्थ 84131, 86532... ही फळं देखील सेंद्रीय नसतात. पण ही फळं थोडी महागडी असतात. 


9 अंकांनी सुरु होणारा कोड
काही फळांवर चिकटवण्यात आलेल्या स्टिकर्सवर 9 अंकानी सुरु होणारा कोड असतो. उदाहरणार्थ 93435, 91435... याचा अर्थ ही फळे सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत. यामध्ये कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही. याला सर्वात सुरक्षित फळ म्हटले जाते आणि किंमतीत महाग असूनही ते आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे.


नकली स्टिकर्स ओळखा
भारतीय बाजारपेठेत काही फळांवर चिकटवण्यात आलेल्या स्टिकर्सवर कोड लिहिलेला नसतो. त्याऐवजी एक्स्पोर्ट क्वालिटी, बेस्ट क्वालिटी किंवा प्रीमिअम क्वालिटी असं लिहिलेलं असंत. पण स्टिकर्स नकली असतात. फळांवर असे कोणतेही स्टिकर्स लावण्याची परवानगी नाही.