दिवसभर `एसी`त असाल तर या समस्यांपासून जरा जपून...
उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमुळे अंगाची लाही लाही होते हे समजू शकतं... पण यामुळे तुम्ही दिवसभर घरात किंवा
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात गरमीमुळे अंगाची लाही लाही होते हे समजू शकतं... पण यामुळे तुम्ही दिवसभर घरात किंवा
ऑफिसमधल्या एसी चालू ठेवत असाल... तर तुम्हाला काही आजारांपासून सावध राहायला हवं. उन्हाळ्याच्या दिवसांत एसीची थंड हवा तुमच्या शरीरासोबतच मनालाही गारवा देते... परंतु, त्याचा तुमच्या आरोग्यावर मात्र वाईट परिणाम होतो. आता एसीची थंड हवा तुमच्या शरीरासाठी कशी धोकायदायक ठरू शकते, ते जाणून घ्या...
जरा जपूनच वापरा एसी...
- दिवसभर एसीची हवा खाणाऱ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते
- तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एसीमुळे अनेकांना दम्याचा त्रासही सतावतो... यामागचं कारण म्हणजे दिवसभर रूम बंद असते आणि त्यामुळे ताजी हवा घरात येऊ शकत नाही... अशातच त्याच रुममध्ये एखादी व्यक्ती श्वासाच्या आजारांनी ग्रस्त असेल तर त्याच हवेत श्वासोच्छ्वास करणं तुम्हाला आजाराकडे ढकलू शकतं.
- सोबतच दिवसभर एसीमध्ये बसून राहिल्यानं खूप थकवाही जाणवतो... याचं कारण म्हणजे बंद रुममधली ऑक्सिजनची कमतरता...
- ऋतुमान बदलताना एसीरुममध्ये बसणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे फ्लू, थंडी, सर्दी, कफ यांसारखे आजार जाणवतात... त्याचंही कारण आहे ताज्या हवेची कमतरता...
- तसंच एसीमध्ये बसणाऱ्या सर्वात जास्त लोकांना भेडसावणारा आजार म्हणजे डोळे कोरडे पडणं... आणि डोळ्यांना खाज सुटणं... डोळ्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर या समस्या गंभीर स्वरुप धारण करू शकतात.