Cloves Benefits For Male: घसा खवखवत असेल किंवा सर्दी-खोकल्यामुळं हैराण झाल्यावर लवंग घालून छान काढा केला जातो. लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. कधी कधी चहातदेखील लवंग टाकून प्यायले जाते. नेहमी जेवणात मसाला म्हणून वापरली जाणारी लवंग आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. लवंगला वैज्ञानिकदृष्ट्या सीजिगियम एरॉमेटिकम म्हणून ओळखले जाते. लवंगाबरोबरच त्याचे तेलदेखील खूप फायद्याचे ठरते. दातदुखीच्या बाबतीत लवंग उपयोगाचे ठरते.लवंग पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊया लवंगाचे फायदे. 


लवंगात असतात हे गुण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवंगात व्हिटॅमिन, फॉस्फोरस, फायबर, प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनीज कार्बोहायड्रेट आणि अँटीऑक्सिडेंटसह अन्य पोषक तत्वे असतात. जे शरीरावर सकारात्मत फरक जाणवतात. त्यामुळं लवंगाचा वापर केल्यास तुमच्या शरीरावर सकारात्मक प्रभाव दिसून येईल. 


पुरुषांसाठी लवंगाचे फायदे


पुरुषांसाठी लवंग हे वरदान आहे. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी ते त्यांच्यातील प्रजनन क्षमता सुधारण्यास देखील लवंग मदत करू शकते. पुरुषांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहाराची मोठी भूमिका असते. वय, आहार किंवा मद्यपान यामुळं शुक्राणुची संख्या कमी होऊ शकते. पण लवंगामध्ये अँटिऑक्सिडेंट. ज्यामुळं स्पर्म काउंट वाढते. दुधात लवंग मिसळून त्याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो. लवंगाचा प्रभाव उष्ण असतो त्यामुळं सकाळी-सकाळी दोन लवंगाच्या पाकळ्यांचे सेवन केल्यास हाडांना बळकटी मिळते. 


लवंगामध्ये फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि सॅपोनिन्स सारखी फायटोकेमिकल्स असतात, जी लैंगिक इच्छा उत्तेजित करण्यास किंवा कामवासना वाढविण्यास मदत करतात, असं एका संशोधनात आढळून आले आहे. लवंगात अँटीजिंजिविटिस आणि अँटीप्लाक गुणधर्म असतात. तोंडातून दुर्गंधी येत असेल तर लवंगाच्या दोन पाकळ्या तोंडात ठेवून दिल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात दुर्गंधी येत नाही. 


कधीकधी अचानक आपल्याला दातांमध्ये वेदना होतात.या वेदना शांत करण्यासाठी लवंग एक प्रभावी उपाय आहे.लवंगात वेदनाशामक गुणधर्म असतात जे दातांमध्ये निर्माण होणारी वेदना दूर करतात. जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल तर लवंगाच्या तेलाचा वास  घेतल्याने डोकेदुखी थांबते.   हे लक्षात ठेवा की लवंग ही एक औषधी वनस्पती आहे आणि त्याचे अगदी कमी प्रमाणातच सेवन केले पाहिजे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)