बस्स काय! एकटा एकटाच खातो काय? पण खरच एकटे खाण्याचे हे आहेत Side Effect
एकटे-एकटे जेवत (Eating Alone) असाल तर तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. एकटं बसून जेवल्याने तुमच्या मागे अनेक आरोग्याच्या समस्या लागू शकतात.
Eating Alone Can Also Be Dangerous: आपल्या शरीराला मजबूती मिळावी आणि ताकद मिळावी यासाठी आपण जेवतो (Food). मात्र कधी-कधी तुम्ही खात असलेलं जेवण हे आजारांचं (Health Problems) कारण बनू शकतं. तुम्हाला हे वाक्य थोडंसं खटकेल, मात्र हो जर तुम्ही एकटे-एकटे जेवत (Eating Alone) असाल तर तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. एकटं बसून जेवल्याने तुमच्या मागे अनेक आरोग्याच्या समस्या लागू शकतात.
एकत्र बसून जेवल्याने तुमचं मन खुश राहतं. शिवाय याचे अनेक फायदे देखील असतात. तेच जर तुम्ही एकटे बसून जेवत असाल तर तुम्हाला मानसिक समस्या त्रास देण्याची शक्यता असते. चला आम्ही तुम्हाला सांगतो, एकटं बसून जेवल्याने कोणते नुकसान होतात.
एकटं खाल्ल्याने होतात हे नुकसान
हृदयाच्या आजारांचा धोका
एकटं बसून खाल्ल्याने हृदयाच्या आजारांचा धोका अधिक वाढतो. असं यामुळे होतं कारण एकटं बसून जेवल्याने Enzyme होण्याचा धोका 3 पटीने वाढतो. Enzyme कोरोनारी आर्टरी डिसीजचं एक लक्षणं आहे, द्यामुळे हृदयात रक्त प्रवाह कमी होतो. त्यामुळे एकटं बसून खाण्याऐवजी कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जेवावं.
डिप्रेशन
एकटं बसून खाल्ल्याने तुम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यता असते. असं यामुळे होतं कारण एकटं खाल्ल्याने, कोणाशीही न बोलता जेवल्याने एकटेपणा जाणवतो. हळू-हळू ही गोष्ट डिप्रेशनचं रूप धारण करते. डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे.
लठ्ठपणा
शरीर फीट ठेवण्यासाठी तुम्ही कमी कॅलरीज सेवन केलं पाहिजे. मात्र जेव्हा तुम्ही एकटे खाणं खाता तेव्हा लोकं अधिक कॅलरीजचं सेवन करतात. यामागील कारण म्हणजे, एकटं जेवल्याने तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण जेवता, ज्यामुळे तुम्ही लठ्ठ होण्याचा धोका वाढतो.