Ghee benefits to body:  तूप आरोग्यासाठी अतिशयक पौष्टिक  समजलं जात तुपामध्ये असणारे विविध घटक शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. पण प्रत्येकालाच तूप खाल्ल्याने फायदा होतोच असं नाही...हो ऐकून तुम्हालाही नवल वाटलं असेल पण हे खरं आहे कि तुपाचं सेवन सर्वानाच फायदा देत असं नाहीये.  (disadvantages of having ghee)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूप खाण्याचेसुद्धा काही नियम आहेत , आयुर्वेदात याविषयी माहिती देण्यात आली आहे चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर... (having ghee benefits to body in aayurveda)


आणखी वाचा: Cooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips


* तुपात असे अनेक घटक आहेत जे अँटी एजिंग आहेत शरीराचे एजिंग पासून रक्षण करण्याचं काम ते करतात.  तुपातील अनेक घटक शरीराचे एजिंग इफेक्टपासून संरक्षण करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. 


* याशिवाय  आपली स्मरणशक्ती  वाढवण्यासाठी  पचनशक्ती सुधारण्यासाठी ,बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी तुपाचं सेवन खूप फायदेशीर आहे. 


 पण इतके फायदे असूनही तूप काही जणांनी खायचं टाळावं असं का म्हटलं जात? तर वाचा त्याच सविस्तर उत्तर वाचा ... 


* तूप जड असत म्हणून ज्यांना पोटाचा त्रास आहे,त्यांनी तूप खाण्याआधी सल्ला घ्यावा. जर तुम्हाला IBS-D सारखा आजार म्हणजेच, पोटाच्या खालील भागात दुखत असेल, गॅसेस ची समस्या असेल तर तूप टाळणे केव्हाही चांगले.


* जर तुम्हाला ताप असेल तूप खाऊ नका, विशेषतः  हवामानात बदल झाला कि आरोग्य बिघडत एकूणच ताप येतो, अश्या वेळी तूप खाल्ल तर छातीत कफ होतो आणि खोकला येतो, त्यामुळे अश्या वेळी तूप खाणं टाळणं केव्हाही उत्तम. 


* आयुर्वेदात गरोदर महिलांना तूप खाताना काई गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्या. गर्भवती महिला  (preganant ladies) ज्यांचं वजन आधीच जास्त आहे अश्यानी तूप खान तलाव असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. अन्यथा वजन जास्त वाढू शकते.


* जर तुम्हाला लिव्हर संधर्भात काहीही आजार  (liver problem people should avoid ghee) असेल तर तूप खाताना विशेष काळजी घेण्याचं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. अश्यात तूप खाल्लं तर आजार आणखी बळावू शकतो.