Food To avoid while eating chicken: आपल्या सगळ्यांनाच चिकनचे (chicken) प्रदार्थ खायला आवडतात. मासेही (fish) आपल्याला फार आवडतात. चिकन खाताना (health news) आपल्याला काही पथ्यही पाळावी लागतात. जसे की चिकन किंवा चिकनचे कोणतेही पदार्थ खाताना किंवा ते खाण्यापुर्वी आणि नंतर काही पदार्थ खाणं (what to eat while having chicken) शक्यतो टाळावे. तुम्हाला चिकनच्या पदार्थांची माहिती असेलच परंतु त्यातही काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. परंतु चिकनसोबत काही पदार्थ खाणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (health) आहे. हे पदार्थ खाल्लाने तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीरारत ऍलर्जी (allergy) आणि तशा रिएक्शन्सही (reactions) येऊ लागतात आण जर का याचे प्रमाण वाढत गेले तर त्यातून गंभीर आजारांचे कारण देखील बनू शकते. हे पदार्थ कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तेव्हा जाणून घेऊया चिकन खाताना त्यासोबत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत. (health tips food to avoid while eating chicken see what are the problems)


दूध (Milk) - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात दुधासोबत (milk) चिकन खाणं म्हणजे विष खाण्यासारखं आहे. दुधासोबत चिकन खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर फार वाईट परिणाम होयला लागतो. यामुळे शरीरात ऍलर्जी होऊ शकते. दूध आणि चिकन एकत्र खाल्लानं त्वचेच्याही समस्याही उद्भवायला लागतात. चिकनसोबत दूध खाल्लानं अनेकांना पुरळं, पांढरे डाग आणि खाज येण्याचीही समस्या उद्भवू शकते. तेव्हा दूध आणि दूधाच्या प्रकारापासून लांब राहा आणि चिकनसोबत हे पदार्थ चूकुनही खाऊ नका. 


हेही वाचा - स्वस्त धान्य रेशनच्या दुकानात येत होतं, पण लोकांच्या घरात जात नव्हतं... अशी झाली पोलखोल


दही (Curd) - 


वर म्हटल्याप्रमाणे, दूधासोबत चिकन खाणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे शरीरावर (is chicken is healthy) त्याचा परिणाम होऊ शकतो. दूध वाईट म्हटल्यावर त्याचे पदार्थही चिकनसोबत आपण खाऊ शकत नाही. त्यामुळे हे पदार्थ एकत्र खाणं म्हणूनच तुमच्या जीवावर बेतू शकते. अनेकांना अशीही सवय असते की ते प्रत्येक गोष्टीत दही घालून खातात. अनेक जण अशाप्रकारे चिकनही (chicken) खाण्याचा प्रयत्न करतात परंतु अश्या पद्धतीनं चिकन खाणं हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. दह्यामुळे चव वाढते हे खरंय पण प्रत्येक चवीष्ट गोष्ट ही आपल्या आरोग्यासाठी (health chicken) चांगली असेलच असं नाही. तेव्हा काही लोकं चिकनसोबत दहीही खाण्याचा प्रयत्न करतात. दह्याचा प्रभाव हा खंड असतो तर चिकन हे गरम असते तेव्हा चिकन आणि दही खाल्ल्यानं आपल्या पचनप्रक्रियेवर परिणाम होतो. 


मासे आणि चिकन (Fish and Chicken) - 


चिकनसोबत मासे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. चिकन आणि मासे या दोन्हीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात परंतु या दोन्हीमध्ये विविध प्रकारचे प्रथिने आढळतात. हे प्रोटीन (protein) शरीरावर प्रतिक्रिया देऊ शकते. यामुळे शरीराला इजा होऊ शकते त्यामुळे चिकन आणि मासे एकत्र खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.