मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बदलत्या आहारामुळे शरिरात कायम रक्ताची कमतरता भासते. शरिरात रक्ताची कामतरता ही समस्या स्त्रियांमध्ये प्रमुख्याने आढळते. निरोगी आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त असणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा अनेक समस्या वाढण्याचा धोका असतो. शरिरात रक्त तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्यास हाडे कमजोर होतात. याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. त्याचप्रमाणे मेंदूच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विस्मृतीचा त्रास होतो. त्यामुळे शरिरात रक्ताची कमतरता हे कारण असल्यास आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने नैसर्गिकरित्या रक्त वाढू शकते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डाळिंब - 
रक्त वाढवण्यासाठी डाळिंब अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात आढळतात. डाळिंब रसाच्या स्वरूपात खाण्यापेक्षा थेट खाणं अधिक फायदेशीर आहे. गरोदर स्त्रियांनी नियमित डाळिंब खाणे आरोग्यास फायदेशीर असते. 


बीट - 
शरिरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे. आहारात सलाडपासून अगदी गोडाच्या पदार्थांपर्यंत बीटाचा समावेश करता येऊ शकतो. सकाळी नाश्ताला बीटचा रस, पराठे यांचा समावेश केला जाऊ शकतो. 


सफरचंद - 
हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढवण्याचा हमखास रामबाण उपाय म्हणजे सफरचंद. सफरचंदासोबत मध मिसळून खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. यामुळे शरिरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. 


पालक - 
पालक हे आयुर्वेदामध्ये रक्तवर्धक म्हणून समजले जाते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास पालकचा रस नियमित प्यायल्यास फायदा होऊ शकतो. 


खजूर - 
खजूर हा नैसर्गिकरित्या गोड असल्याने त्याचा वापर आहारात अनेक प्रकारे केला जातो. रक्ताची कमतरता भरून काढायची असल्यास दुधात खजूर मिसळून प्यावे. खारीक पूड देखील रक्त वाढीसाठी फायदेशीर आहे. म्हणून सलाड किंवा दुधातदेखील खारीक पूड मिसळू शकता.