Is Chewing Ice Bad For Teeth: उन्हाळ्याच्या दिवसांत थंड पिण्याचे मन करते. या दिवसांत लोक खूप जास्त कोल्डड्रिंक्स पितात. अनेकदा कोल्ड्रिंक अधिक थंड करण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडेदेखील टाकतात. तर, बऱ्याचदा अनेक रेस्टॉरंटमध्ये शीतपेयांमध्ये बर्फ टाकून दिला जातो. शीतपेय संपल्यानंतर त्यात शिल्लक राहिलेला बर्फ मोठ्या आवडीने लोक चावून खातात. पण तुम्हाला माहितीये का बर्फ चावून खाण्याची ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकतो. बर्फ चावणे तुमच्या दातांसाठी खूप हानिकारक आहे. डेंटिस्टने दिलेल्या माहितीनुसार, या सवयीमुळं दातांत फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

USA Todayच्या रिपोर्टनुसार, कच्चा बर्फ चावणे दातांसाठी खूप नुकसानदायक ठरु शकते. बर्फ का कठिण स्वरुपात असतो त्यामुळं बर्फ चावल्यामुळं दातात फ्रॅक्चर होऊ शकते. यामुळं दातांवर असलेले इनॅमल खराब होऊ शकते आणि सेन्सेशनसंबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. बर्फा चावल्यामुळं तुमच्या दातात असह्य वेदना निर्माण होऊ शकतात. बर्फाचे तापमान खूप कमी असते यामुळं दातांचे इंप्लांट आणि फिलिंग्स खराब होऊ शकतात. डेंटिस्टने दिलेल्या माहितीनुसार, कच्चा बर्फ चावून खाणे दातांसाठी योग्य नाहीये. 


अमेरिकन डेंटल असोसिएशनचे प्रवक्ते आणि डेंटिस्ट डॉ. रुपाली कुलकर्णी यांनी युएस टुडेला दिलेल्या माहितीनुसार, आइस क्युब किंवा कच्चा बर्फ दातावर असलेल्या टणक आवरणाइतकंच कठोर असते. जेव्हा एखादा व्यक्ती बर्फ चावतो तेव्हा इनेमल आणि आइस क्रिस्टल एकमेकांना टक्कर देतात. यामुळं दातांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. इनेमल म्हणजे दातांवर असलेले टणक आवरण जे बाहेरच्या प्रदूषणापासून दातांचा बचाव करतो. इनेमल हाडांइतके टणक असते. दातांचे इनेमल डॅमेज झाल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्फ चावण्याची सवय एक मेंटल डिसऑर्डर आहे. याता पैगोफैगिया असंही म्हणतात. यामुळं त्रस्त असलेले लोक अनेकदा बर्फ किंवा टणक वस्तु चावण्यास सुरुवात करतात. ज्यात कोणत्याही प्रकारचे पोषकतत्वे नसतात. पण हे गरजेचे नाहीये की ज्यांना बर्फ चावण्याची सवय आहे त्यांना पण हा आजार असतो. काही जण उन्हाळ्यात थंड खावेसे वाटते म्हणून बर्फ खातात. आरोग्यासाठीही बर्फ चावणे खूप हानिकारक आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)