आठवड्यातून एकदातरी मासे खावेच; आरोग्याच्या अनेक समस्यांवर आहे नैसर्गिक औषध
Benefits Of Eating Fish: दररोज मासे खाण्याचे अगणित फायदे आहेत. रोज रोज उद्भवणाऱ्या समस्यांवर मासे हा रामबाण उपाय ठरू शकतो.
Benefits Of Eating Fish: पापलेट, सूरमई, बोंबील, कोलंबी या मासळीचे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. नॉनव्हेजिटेरियन खव्वयांचा विक पॉइंट म्हणजे मासे. जगभरात मासे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. कोकणात फिरायला गेल्यावर पर्यटक माशांवर यथेच्छ ताव मारतात. मासे खाण्याचे आरोग्यासाठीही भरपूर फायदे आहेत. अनेक संशोधनातही हे सिद्ध झाले आहे की, आठवड्यातून एकदा तरी मासे खावेत. माशांमुळं अनेक आरोग्याच्या समस्यांवर मात करता येते. मासळी खाण्याचे काय आहेत फायदे, जाणून घेऊया.
मासळी ही चवीला स्वादिष्ट तर आहेतच त्याचबरोबर त्यात अनेक पोषक तत्वे असतात. आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्वे माशांमध्ये आढळतात. त्यामुळं माशांच्या सेवनाने अनेक रोगांचा धोका कमी होतो. सी फुडमध्ये ओमेगा-3, फॅटी अॅसिड सारखे गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळं कर्करोग आणि हृदयविकार यासारख्या आजारांवर मात करता येते.
मेंदूच्या आरोग्यासाठी
माशांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे लोक आठवड्यातून दोनदा किंवा अधिक वेळा मासे खातात त्यांना मेंदूशी संबंधित गुंतागुंतीचे आजार होण्याचा धोका कमी असतो. ओमेगा-३ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड सेरेब्रोव्हस्कुलर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मासे खाल्ल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका टाळू शकता.
मूड फ्रेश ठेवते
नैराश्यामुळं मुड बिघडणे, चिडचिडेपणा, तणाव यासारखी परिस्थीती उद्भवते. आठवड्यातून एकदा मासे खाल्ल्याने नैराश्यावर मात करणे सहज सोप्पे होते. कारण माशांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड मेंदूतील inflammation कमी करण्यास मदत करते. जे नैराश्याशी निगडीत आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी
माशांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड डोळ्यांसंबधित आजार दूर ठेवण्यास मदत करते. माशांमध्ये या आल्माचे प्रमाण जास्त असते त्यामुळं डोळ्यांची दृष्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हाडांच्या आरोग्यासाठी
माशांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत असतो. हाडांसाठी व दाताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आठवड्यातून दोनदा तरी मासे खावेत.
कर्करोगाचा धोका
नियमितपणे मासे खाल्ल्यास कर्करोगाचा धोका टाळतो. prostate and colorectal cancer चा धोका कमी होतो, असे संशोधनात दिसून आले आहे.
शांत झोपेसाठी
माशांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण भरपूर असते. ज्याच्या नियमित सेवनाने निद्रानाशाची समस्या आटोक्यात येते. यामुळं चांगली झोपही लागते.
पक्षाघाताचा धोका कमी होतो
माशांच्या सेवनाने रक्तवाहिन्यांसंबधी मेंदूंचे नुकसान होण्याची जोखीम लक्षणीयरित्या कमी होते, असं संशोधनात आढळले आहे. त्यामुळं पक्षाघाताचा धोकादेखील कमी होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)