एकच साबण सगळ्यांनी वापरणं योग्य आहे का? त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो?
Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना एकच साबण सगळ्यांनी वापरावा का? तर जाणून घ्या नेमकं काय आहे कारण
Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना साबण सगळेचजण वापरतात. हल्ली बॉडी वॉशदेखील बाजारात आले आहेत. मात्र, आजही घराघरात साबणाचाच वापर केला जातो. मात्र, संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरावा का? त्याचा त्वचेवर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
त्वचेची काळजी ही प्रत्येकाला घ्यायलाच हवी. आंघोळ करत असताना हल्ली काही जण त्यांच्या त्वचेनुसार फेसवॉश वापरतात. पण साबण मात्र सगळेजण एकच वापरतात. तसंच, एकच साबण हा हात धुण्यासाठी व आंघोळीसाठी वापरला जातो. पण नकळतपणे त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होताना दिसतो. जर, कुटुंबातील सर्वच सदस्य एकच साबण वापरत असतील तर तो वापरताना काय काळजी घ्यायला हवी याची माहिती असणे गरजेचे आहे.
साबणाने तुमची त्वचा स्वच्छ होते. त्यावरील मळ, जिवाणू निघून जाते. पण तसंच, त्वचेवरील मॉइश्चरायझरदेखील निघून जाते. त्यामुळं आंघोळीसाठी साबण निवडताना असा निवडा ज्यामुळं त्वचा मऊ राहू शकते. त्वचा हायड्रेट राहिल आणि पोषण देईल, अशा साबणाचा वापर करावा. तसंच, आंघोळीनंतर त्वचेला तेलकटपणा येणार नाही असं मॉइश्चरायझर नक्की वापरावं.
सगळ्यांनी एकच साबण वापरावा का?
सगळेजण एकच प्रकारचा साबण वापरत असल्यास त्यावर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया साबणावर चिटकून असतात. साबणाच्या एका वडीवर 2 ते 5 प्रकारचे किटाणू व बॅक्टेरिया असतात. या जंतूंमध्ये ई-कोला, साल्मोनेला, शिगेला बॅक्टेरिया, नोराव्हायरस आणि रोटा व्हायरस सारख्या विषाणूंचा समावेश असतो. त्यातील काही बॅक्टेरिया जखमा व ओरबाड्यांद्वारे पसरतात तर काही विष्ठेद्वारे पसरतात.
जर तुम्ही सर्व कुटुंब मिळून एकच साबण शेअर करत असाल तर वापरण्यापूर्वी तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तसंच, साबण थेट त्वचेवर लावण्यापूर्वी आधी हातांवर चोळून त्याचा फेस तयार करा आणि मगच शरीरावर लावा. तसंच, साबण ओला असताना वाळवू नका. कारण ओल्या साबणावर अधिक बॅक्टिरिया वाढवण्याची शक्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )