Foods To Avoid At Night: भारतीय खाद्य संस्कृती व परंपरेनुसार भोजनासंबंधीदेखील काही तत्वे पाळली जातात. असं म्हणतात की  सकाळची न्याहरी राजा सारखी असावी, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण हे गरिबासारखे करावे. त्यामागेदेखील कारण आहे. रात्रीचे जेवण कमीच करावे. तसंच, रात्रीच्या वेळी काही भाज्या सेवन करणे पाचन तंत्रावर नकारात्मक प्रभाव टाकतात. ज्या गोष्टी पचायला त्रास होतो अशा गोष्टीचे सेवन करणे रात्री टाळले पाहिजे, असं म्हणतात. काही भाज्या अशा असतात ज्या पचायला जड जातात. त्यामुळं गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या निर्माण होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री पचनासंबंधी काही समस्या निर्माण झाल्यास तुमच्या झोपेवरही त्याचा परिणाम पडतो. झोपेत अडथळा निर्माण झाल्यास तुम्हाला अनिद्रेची समस्या निर्माण होऊ शकते. पोट आणि झोपेच्या समस्येमुळं अन्य स्वास्थसंबंधी समस्या उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळं आम्ही आज तुम्हाला पाच अशा भाज्यांबाबत सांगणार आहोत ज्याचे सेवन रात्री करणे टाळले पाहिजे. 


वांगे 


वांग्यात सोलेनिन नावाचे तत्व असते. ज्यामुळं पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं वांग्याचे सेवन करण्याने पोट जड वाटू लागते. म्हणूनच रात्री वांग्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. 


टॉमेटो


टॉमेटोमध्ये अॅसिडिटी वाढवणारे तत्वे असतात. रात्री टॉमेटो खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स किंवा हार्टबर्न होण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळं तुमच्या झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो.


ढोबळी मिरची


ढोबळी मिरचीमध्ये कॅप्साईसिन नावाचे तत्व शरीरात उष्णता वाढवतात. त्यामुळं अधिक सेवनाने पोटात उष्णता निर्माण होऊ शकते. रात्री मिरची खाल्ल्याने पोटात जळजळ आणि पाचन संबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं रात्री कमी मिरचीचे सेवन करण्याचे प्रयत्न करा. 


कोबी


कोबी खाल्ल्यानेही अधिक गॅस निर्माण होतो. त्यामुळं रात्री पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. त्यामुळं रात्री झोपेसंबंधी समस्या निर्माण होतात.


भेंडी


भेंडीमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. मात्र त्यात अशा प्रकारचे काही तत्वे आढळले जातात जे पाचनतंत्र बिघडवतात. त्यामुळं रात्री खाण्यासंबंधी समस्या आणि झोपेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळं रात्री या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. जे पदार्थ पचनास हलके आहेत त्यांचेच सेवन करावे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)