दररोज बियर पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वाचून व्हाल चकित
Beer Benefits: दारू आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. पण बिअरबाबतच्या सर्व संशोधन असे सूचित करते की, जर बिअरचे प्रमाण कमी प्रमाणात घेतले तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.
Beer Benefits News In Marathi: मद्यपान किंवा धुम्रपान करु नये असं सांगितले जाते, कारण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र, तरीही आजची तरुणाई अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्याचे दिसून येतात. पण तुम्हाला कुणी सांगितले बिअर पिणे शरीरासाठी वरदान ठरू शकते? तर तुमचा विश्वास नाही बसणार ना. पण बिअर पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे. अनेकांचे बियर हे आवडते पेय आहे. यामुळे अनेक जण इतर पेयांपेक्षा बियरचे सेवन करतात. बियर हे देखील एक अल्कोहोलिक पेय आहे.
अनेकांना रोज विविध प्रकारचे ड्रिंक करण्याची सवय असते. कोणाला वाइन प्यायची सवय तर कोणाला साधा लेमन ज्यूस पिण्याची सवय असते. तर काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. पण, जर तुम्हाला असे वाटत असेल तर ते चुकीचे असेल. कारण बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण आपण रोज किती बिअर प्यायली पाहिजे हे बहुतेकांना माहीत नसते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बिअरमध्ये अल्कोहोलचे (alcohol) प्रमाण देखील कमी आहे आणि ते इतर मादक पेयांपेक्षा कमी हानिकारक मानले जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बिअर प्यायल्याने अनेक गंभीर आजारांचा धोकाही दूर होतो.
या कारणांसाठी बीयर फायदेशीर
अनेकांना बीयरचं सेवन करणं हे नशेचा किंवा मादक पेयांच्या सेवनाचा एक भाग वाटतो. मात्र प्रमाणात बीअरचं सेवन करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. म्हणूनचं कॅलरीच गणित सांभाळून बिअर पिणे या कारणांसाठी फायदेशीर ठरते. लाईट बिअरचा एक कॅन – 102.7 cal (1 can = 350ml) रेग्युलर बिअरचा एक कॅन – 153.1 cal ((1 can = 350ml) बाटलीभर फ्रुट बिअर – 130 cal (1 bottle = 550 ml) बाटलीभर Sapporo बिअर – 257 cal ((1 bottle = 550 ml)
हाडांची डेन्सिटी सुधारते
बीयरच्या सेवनामुळे शरीरात हाडांची डेन्सिटी सुधारण्यास मदत होते. बिअरमध्ये सिलिकॉनचं प्रमाण मुबलक प्रमाणात असते. तुफ्त युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, क्वचित बीअरचं सेवन करण्याच्या तुलनेत नियमित पण प्रमाणात बीअरचं सेवन करण्यांमध्ये हाडांचे,सांध्यांचे दुखणे कमी असते. काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी करण्यास मदत होते.
हृद्याचे कार्य सुधारते
एका संशोधनानुसार, नियमित सुमारे 473 मिली (1 pint) बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते. हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते
मूतखड्याचा त्रास कमी
बीअरमध्ये 93% पाणी असते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक मूत्रा मार्गे बाहेर टाकण्यासाठी मदत होते. यामुळे किडनीचं कार्य सुधारते. मात्र बीअरचं सेवन प्रमाणात करणं आवश्यक आहे. अनेकजण बीअरच्या सेवनामुळे मूतखड्याचा त्रास कमी झाल्याचेही सांंगतात
कॅन्सर
शिजवलेल्या मांसामधील कॅन्सरला चालना देणारे घटक कमी करण्याची क्षमता बिअरमध्ये असते. त्यामुळे प्रमाणात केलेले बिअरचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.बीअरमध्ये पॉलीफेनोल घटक मुबलक असल्याने प्रोस्टेट कॅन्सरप्रमाणे अन्य कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
केसातील कोंड्याची समस्या कमी
बीअर शाम्पू केसांचे आरोग्य खुलवण्यासाठी फायदेशीर ठरते. बीयरमध्ये व्हिटॅमिन बी आणि यिस्टचे प्रमाण मुबलक असल्याने बीअरचा वापर केल्याने केसातील कोंड्याची समस्या कमी होते. नियमित आठवड्यातून 2-3 दिवस बिअरने केस धुणे फायदेशीर ठरते.
अल्जाइमर
बीअर प्रमाणात प्यायल्यास अल्जाइमर आणि डिमेंशिया चा धोका कमी होतो. 11 हजार वृद्ध महिलांवर केलेल्या एका संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)