मासिक पाळीत केस धुतल्यास खरंच रक्तस्त्राव कमी होतो, सत्य काय?
Menstrual Cycle Myths: मासिक पाळीच्या दिवसांत खरंच केस धुवावेत का? याबाबत अनेक समजूती आहेत. पण त्या दाव्यामागील सत्यता काय आहे, हे आज जाणून घेऊया.
Menstrual Cycle Myths: मासिक पाळी आणि त्यातील विविध समजूतींचा अजूनही महिलांच्या मनावर पगडा आहे. काळ कितीही बदलला असला तरीही पाळीविषयी आजही उघडपणे बोलले जात नाही. पाळीच्या बाबतीत आजही लोक जुन्या काळातील समजुती पाळत असतात. यातील काही गोष्टींनी काहीही शास्त्रीय आधार नसतो मात्र तरीही पूर्वापार चालत असलेल्या या समजूती अजूनही देशातील व राज्यातील काही भागात प्रचलित आहेत. त्यातीलच एक समजूत म्हणजे मासिक पाळी दरम्यान केस धुवू नये. खरंच या समजूतीमागे काही शास्त्रीय आधार आहे का? जाणून घेऊया.
प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचं चक्र तिच्या आरोग्यानुसार वेगवेगळं असतं. काही जणींच्या मासिक पाळी पाच दिवस येते तर काहींना ८ दिवसांपर्यंत पाळी येते. त्यामुळे साधारणपणे मासिक पाळीचं चक्र २ ते ५ या दिवसांपर्यंत असतं. मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरुन अंघोळ करावी असं म्हटलं जातं. तर, काहींच्या मते, मासिक पाळीच्या काळात केस धुवूच नये असं सांगितलं जातं. परंतु, या दाव्यात किती तथ्य आहे. जाणून घेऊया.
मासिकपाळीच्या दरम्यान केस धुवू नयेत असा दावा करण्यात येतो. म्हणूनच महिलांना किंवा तरुणींना पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी केस धुण्यास सांगितले जाते. पाळीच्या दिवसांत केस का धुवू नया यामागे एक कारणही सांगितले जाते. पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत केस धुवू नयेत कारण या दिवसांमध्ये महिलांच्या शरीराचे तापमान खूप जास्त असते. त्यामुळं या दिवसांत केस धुतल्यास शरीराचे तापमान कमी होते. व रक्तस्त्राव नीट होत नाही. अशा स्थितीत महिलांना अनेक आजारांचा धोका संभवू शकतो, असं म्हटलं गेलं आहे.
मात्र, प्रत्यक्षात पाहायला गेलं तर पाळीचा आणि केस धुण्याचा काहीएक संबंध नाहीये. याउलट पाळीच्या दिवसांत स्त्रियांनी जास्तीत जास्त शारिरीक स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात कोणत्याही दिवशी केस धुतले तरीदेखील त्याचा कोणताही अपाय होत नाही. उलटपक्षी ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे.
मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. त्यामुळं बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. या दरम्यान अंघोळ केल्याने किंवा केस धुतल्याने कोणताही त्रास होत नाही. महिलांनी या काळात स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
मासिक पाळीत केस धुण्याचे हे आहेत फायदे
मासिक पाळीत दिवसांतून दोनदा अंघोळ करणे गरजेचे आहे. शरीरा निरोगी ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. यातून तुम्हाला फायदेही मिळू शकतात.
मासिक पाळीदरम्यान शरीर निरोगी ठेवल्यास जळजळ आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
केस धुतल्यानंतर आणि आंघोळ केल्यानंत तणावमुक्त वाटते. तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. डोकेदुखी, पाठदुखीपासूनही आराम मिळू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)