Sitting On Toilet Seat For Long time: आजकाल लोक अनेकदा तासन् तास बाथरूममध्ये बसतात. अनेकांना बाथरूममध्ये बसून पेपर वाचण्याची सवय असते, तर अनेकजण तासन्तास मोबाईल वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. तज्ज्ञांच्या मते, टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक आहे. चला जाणून घेऊया टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक का आहे आणि कोणते आजार आजार होऊ शकतात? 


बॅक्टेरिया आजारी पाडू शकतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉयलेटच्या आत आणि टॉयलेट सीटवर अनेक प्रकारचे धोकादायक जंतू असतात, जे साफ करूनही निघून जात नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती अनेक तास टॉयलेटमध्ये  न्यूजपेपर किंवा फोन घेऊन बसते तेव्हा ते जीवाणू वर्तमानपत्र आणि फोनवरही चिकटतात. घरात पेपर पुन्हा आणला जातो आणि मोबाईलचाही सतत वापर होतो. या दोन्ही गोष्टी साफ करता येत नाहीत. या दोन्ही सवयी तुम्हाला खूप आजारी पाडू शकतात.


मूळव्याधाची समस्या होऊ शकते


तज्ज्ञांच्या मते, जे लोक टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसतात त्यांना मुळव्याध होण्याचा धोका जास्त असतो. याचे मुख्य कारण पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर दीर्घकाळ ताण पडते, ज्यामुळे मूळव्याध होतो असे मानले जाते. 


वाचा: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा..


पचनक्रियेवर परिणाम 


 जे लोक टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसतात त्यांना मूळव्याध होण्याचा धोका जास्त असतो. याचे मुख्य कारण पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर दीर्घकाळ ताण पडतो, ज्यामुळे मूळव्याध होऊ शकतो, असे मानले जाते. मूळव्याध झाल्यास गंभीर वेदना तर होतातच पण भविष्यातही अनेक त्रास सहन करावा लागू शकतो.


स्नायू कमकुवत होतात


जे लोक टॉयलेट सीटवर बराच वेळ बसतात, त्यांच्या पाठीचे आणि पोटाचे स्नायू सैल होऊ लागतात. या स्थितीमुळे तुमच्या हिप आणि पायांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात.