तुमच्या शरीरात असे बदल होत असल्यास वेळीस सावध व्हा, अन्यथा Kidney निकामी होऊ शकते
किडनीत कोणतीही समस्या उद्भवल्यास अनेक बदल होऊ लागतात. जर तुम्ही हे संकेत वेळीच ओळखले तर किडनीशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही.
Kidney Problems Symptoms: शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक अवयवाचं शरीरासाठी योगदान असतं. हृदय, मेंदूप्रमाणे किडनीही शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. बुद्धी तल्लख आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण योग्य आहार आणि ध्यान करतो. त्याचप्रमाणे किडनीचीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा किडनीची समस्या असूनही आपल्याला त्याबद्दल माहिती देखील नसते. परंतु जेव्हा त्याची लक्षणे अधिक वाढतात तेव्हा वेदना सहन करणे सोपे नसते. किडनीत कोणतीही समस्या उद्भवल्यास अनेक बदल होऊ लागतात. जर तुम्ही हे संकेत वेळीच ओळखले तर किडनीशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही महत्वाची लक्षणे सांगा ज्यावर तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे.
थकवा जाणवणे: शरीरातील लहान बदलांकडे दुर्लक्ष केल्यास वाईट परिणाम होऊ शकतात. कमी काम केल्यावरही खूप थकवा येत असेल तर शरीरातील टॉक्सिन्सचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. यासोबतच रक्तातील अशुद्ध पदार्थांचे प्रमाण वाढू लागते आणि नंतर किडनी खराब होऊ लागते.
झोप न येणे: स्लीप एपनिया सारख्या समस्या किडनीच्या आजाराशी संबंधित आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा किडनी खराब होण्याचा धोका असतो.
त्वचेवर खाज सुटणे: तुमची त्वचा कोरडी झाली असेल आणि खाज येत असेल तर सावध व्हा. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि किडनीची तपासणी करा. रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्यामुळे घडते. पाय सुजणे देखील मूत्रपिंडाचा आजार सूचित करते. जेव्हा जेव्हा शरीरात अशी लक्षणे दिसू लागतात तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)