Om Chanting Benefits: संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावला की आजी- आजोबा हमखास देवासमोर बसवून शुंभकरोती कल्याणम बोलायला लावायचे. त्याचबरोबर ॐ चे उच्चारण करण्यास सांगायचे. आपल्या पूर्वजांनी लावलेली सवय काही जणांकडून अजूनही पाळली जाते. योगशास्त्रातही ॐ मंत्राचे महत्त्व सांगितले आहे. योगा करत असताना ओंकारचा जाप केल्यास मानसिक शांतता लाभते. अध्यात्माबरोबरच ओंकार उच्चारणाचे शास्त्रीय कारणेही आहेत. ओंकाराच्या ध्वनी लहरी खूप जास्त पॉवरफुल असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया ओंकाराचे चमत्कारित लाभ जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मानुसार, 'अ'कार हा विष्णु, 'उ'कार महेश, 'म'कार हा ब्रह्मा तिन्ही देवांचे दर्शन आहे. ॐ च्या उच्चारणासह अनेक चमत्कारित लाभ होतात. शारीरक व्याधी आणि मानसिक शांतीसाठी या मंत्राचा जाप केल्यास निश्चित फळ मिळते, असं म्हणतात. निरोगी आरोग्यासाठी ॐ चे उच्चारण खूप फायद्याचे ठरते, अशी मान्यता आहे. 


ॐ च्या उच्चारामुळं निर्माण होणाऱ्या ध्वनीमुळं हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. शारीरिक व्याधींसह मानसिक आजारदेखील दूर होतात. कार्यक्षमता वाढते, असं देखील म्हणतात. 


ज्यांना थायरॉइडची समस्या असेल त्यांना ॐ राचे उच्चारण करणे फायद्याचे ठरते. ॐ उच्चारण केल्याने गळ्यात कंपने निर्माण होतात त्यामुळं थायरॉइडच्या समस्येपासून बचाव होतो. ओंकाराचे उच्चारण केल्यास फफ्फुस, रक्तदाब आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळं हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. 


कसा करावा जप


1 ॐचा जप करण्यापूर्वी काही नियम पाळणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या स्टेप्स प्रमाणेच ॐचे उच्चारण करावे. 


2 जप सुरू करण्यापूर्वी सर्वात पहिले आपले मन सकारात्मक ठेवा.


3 जप नेहमीच शांत व सात्विक वातावरणात करावा. जेणेकरुन तुमचे मन एकाग्र राहिलं. तुमच्या घरातील असा कोपरा पकडा जिथे तुम्हाला शांतात लाभेल. 


4 जप करत असताना जमिनीवर किंवा खुर्चीवर बसू शकता. पण ॐचा जप करत असताना सरळ बसा व सगळा तणाव झटकून टाका त्यानंतर हात गुडघ्यावर किंवा पोटाजवळ ठेवून डोळे बंद करा व दीर्घ श्वास घ्या.


5 या स्थितीत बसल्यानंतर हळहळू ॐ चे उच्चारण करायला सुरुवात करा. हळहळू आवाजाचा स्तर वाढवत न्या. 


6 ॐ चा उच्चारण करत असताना पोटापासून ते छातीपर्यंत कंपन होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.


7 ॐ चे उच्चारण करत असताना त्यातून निर्माण झालेल्या ध्वनीवर व व्हायब्रेशनवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळं तुमच्या शरीरातही कंपन निर्माण होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. 


8 ओंकाराचे उच्चारण सात किंवा त्यापेक्षा जास्त वेळा करु शकता. जप पूर्ण झाल्यानंतर काही वेळ मौनस्थितीत बसा


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)