Health Benefits of Coffee and Tea In Marathi: कोणताही ऋतु असो किंवा दिवसाची सुरुवात...गरमागरम चहा किंवा कॉफीशिवाय होणारच नाही.  काही लोकांना सतत चहा पिण्याची सवय असते. ऑफिसमध्ये किंवा घरी काही लोक अनेकदा चहा-कॉफी पित असतात.  भरपूर काम असल्यामुळे अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय लागते. पण हिच चहा कॉफी आरोग्यासाठी कितीपत फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीय का?


पचनक्रियेला समस्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहा-कॉफीच्या अतिरेकीमुळे अॅसिडिटीचा त्रास (acidity) होऊ शकतो. त्यापाठोपाठ इतर आजारांनाही आमंत्रण मिळत असते. सर्वसामान्यांनी दिवसभरात दोन छोटे कप चहा किंवा कॉफी (Coffee and Tea) पिणेही भरपूर असते. चहा आणि कॉफी ही गरज नव्हे तर ते आरोग्याला घातक ठरणारे व्यसन आहे. म्हणूनच चहा आणि कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करणे योग्य आहे. कारण रिकाम्या पोटी चहा पिल्याने पचनाच्या समस्या वाढतात. पचन योग्य न राहिल्यामुळे दिवसभर चिडचिड आणि पोटात त्रास राहातो. मात्र अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा-कॉफी पिण्याची सवय असते. पण योग्य वेळी सेवन केल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही.


गॅस, पचन, ऍसिडिटी सारखा त्रास


सकाळी चहा-कॉफी (Coffee and Tea) पिणे योग्य मानले जात नाही. पण जर तुम्ही योग्य वेळ निवडली तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिणे म्हणेज गॅस, पचन, ऍसिडिटी या सर्व समस्यांना आमत्रंण दिल्यासारखे आहे. पण जर तुम्ही उठल्यानंतर 1 ते 2 तासांनी कप चहा किंवा कॉफी घेतली तर तुमच्या शरीराला इतका त्रास होणार नाही.


तुम्हाला चहा आणि कॉफी (Coffee and Tea) प्यायला आवडते आणि जर तुम्हाला तुमच्या शरीराला कोणतीही हानी होत नसेल तर तुम्ही जेवल्यानंतर चहा आणि कॉफी पिऊ शकता. हा एक अतिशय योग्य आणि चांगला पर्याय आहे. वास्तविक चाहा हा रिकाम्या पोटी अधिक हानीकारक ठरतो. पण जेवल्यानंतर 1 तासाने चहा-कॉफी प्यायल्यानंतर ते तुमच्यासाठी चांगले राहील.


चहा-कॉफीसोबत बिस्किटे खा..


सकाळी उठल्यावर चहा-कॉफी (Coffee and Tea) प्यावीशी वाटेल आणि तुमचे पोट रिकामे असेल तर अजून एक पर्याय आहे. तो म्हणजे तुम्ही चहा-कॉफीसोबत बिस्किटे खावीत. रिकाम्यापोटी चहा पिण्याऐवजी तुम्ही त्यासह बिस्किटे खाणे योग्य ठरते. यामुळे शरीरावर चहा- कॉफीचा प्रभाव कमी पडतो. 


कॉफी पिण्याने झोपेवर परिणाम 


तुम्ही दिवसातून 1 किंवा 2 वेळा चहा किंवा कॉफी प्यावी. साधारण याचे प्रमाणे 3-4 कप असू शकते. तसेच कॉफीचे सेवन हे संध्याकाळी 4 पर्यंतचे करावे. त्यानंतर कॉफी पिण्याचे झोपेवर परिणाम होतो. त्यातील कॅफेनमुळे तुमची झोप खराब होऊ शकते. 


 


 


 


( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )