महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते कारण...
Why Women Need More Sleep than Men: स्त्रिया या कायमच मल्टिटास्किंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांना पुरेसा आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. परंतु पुरूषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोपेची गरज का असते? या लेखातून जाणून घेऊया.
Why Women Need More Sleep than Men: सध्या सर्वत्र धकाधकीचे जीवन हे वाढू लागले आहे. त्यामुळे सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे झोप अपूरी होण्याची. अनेकांना अपुऱ्या झोपमुळे नीट झोपही येत नाही. त्यामुळे त्यांची याबाबतीत फारच चिडचिड होताना दिसते. आपल्याला झोप अपुरी लागली किंवा स्ट्रेसमुळे अथवा कामाच्या दवाबामुळे किंवा वैयक्तिक तणावामुळे अनेकदा आपल्यालाही झोप लागत नाही. आणि त्यामुळे आपल्याला विविध आजार उद्धभवण्याची शक्यता असते. तेव्हा आपल्याला योग्य त्या पद्धतीनं काळजी घेणे गरजेचे आहे. आपली झोप पुर्ण झाली तर आपला पुढील दिवस चांगला जातो आणि आपल्याला फ्रेशही वाटते. परंतु तुम्हाला माहितीये का की पुरूषांपेक्षा स्त्रियांना झोपची सर्वाधिक गरज असते.
तेव्हा जाणून घेऊया की नक्की पुरूषांपेक्षा स्त्रियांना सर्वाधिक झोपेची गरज का असते? आजकालच्या स्त्रिया या मल्टिटास्किंग करताना दिसतात. त्यामुळे त्यांना अधिक आरामाची गरज लागते. त्या अनेकदा थकतात आणि त्यांच्या वाट्यालाही फार अपूरी झोप येते त्यामुळे त्यांना अनेकप्रकारेचे आजारही होऊ शकतात. स्त्रियांना आपल्या तब्येतीची त्यासाठीच नीट काळजी घेणे आवश्यक ठरते. स्त्रियांबद्दल अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होताना दिसतात त्यामुळे त्यांंच्यात शारीरीक आणि मानसिक बदलही होताना दिसत असतात. अशावेळी त्यांच्यासाठी झोप योग्य असणे आवश्यक असते.
असे म्हटले जाते की पुरूषांपेक्षा स्त्रियांनी 11 मिनिटे अधिक झोप घेतली पाहिजे. जी स्त्रियांना आवश्यक असते. समोर आलेल्या माहितीनुसार, असे कळते की, स्त्रियांमध्ये नैराश्य आणि तणाव पुरूषांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे त्यांनाही योग्य ती झोप मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी स्त्रियांना अपुरी झोप मिळाली तर त्यांच्या तब्येतीत बिघाडही होऊ शकतो. मानसशास्त्रज्ञही स्त्रियांना जास्त झोप घेण्याचा सल्ला देतात. त्यातून आजही आपण पाहतो की, स्त्रिया या अधिक प्रमाणात मल्टिटाक्सिंग करतात. त्यासाठी त्यांना आरामाची अत्यंत आवश्यकता असते. परंतु सध्या त्या त्यांच्या कामात इतक्या बिझी असतात की त्यामुळे त्यांना अनेक अडजणींना सामोरे जावे लागते त्यातून त्यांना अपूरी झोपही मिळते.
हेही वाचा - आगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं घेतलं तगडं मानधन? आकाडा वाचून बसेल धक्का
झोप नाही? काय करावं?
आपल्या मल्टिटास्किंगचे प्लॅनिंग करा.
जास्त वेळ काम होणार असेल तर पेडिंग काम उद्या करा.
लवकरच झोपण्याचा प्रयत्न करा.
योगा करा. व्यायाम करा आणि हेल्थी फूड खा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)