Health tips: बिनधास्त खा डार्क चॉकलेट..हृदय विकारावर फायदेशीर
चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवतात आणि त्वचा टाईट (tight skin) करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दूर होऊन चमक येते.
dark Chocolate Eating Benefits: खायला आवडत नाही असें खूप क्वचितच असतील . लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत चॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. पण आवडूनसुद्धा बरेच जण चॉकलेट खाणं टाळतात त्यांच्या मते, चॉकलेट हे आरोग्यासाठी घातक (Chocolate eating is bad for health) आहे, पण हा समज सपशेल गैरसमज आहे असं म्हणावं लागेल कारण आता तुम्ही बिनधास्त चॉकलेट खाऊ शकता. कारण चॉकलेट खाल्ल्याने नुकसान नाही तर तुमचा फायदाच होणार आहे चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट खाण्याचे हे अनोखे फायदे.. (Benefits of eating dark chocolate know the fact )
लठ्ठपणा कमी करते (fat reduces)
वजन वाढण्याच्या भीतीने जर तुम्ही डार्क चॉकलेट खात नसाल तर आरामात खा. कारण एका अभ्यासानुसार, चॉकलेट खाणाऱ्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स चॉकलेट न खाणाऱ्या लोकांपेक्षा खूपच कमी असतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आणखी वाचा: LIC india: LIC कडून तब्बल 20 लाखांची भेट... ग्राहकांना खुशखबर...
नैराश्य कमी होते: (helpfull in dipressions)
डार्क चॉकलेट डिप्रेशन कमी करण्यासही मदत करते. कोकोमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट तणाव कमी करतात. तसेच ते खाल्ल्याने तणाव वाढवणारे हार्मोन्स नियंत्रणात राहतात. यासोबतच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
हृदयासाठी फायदेशीर (beneficial to heart)
डार्क चॉकलेट खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. डार्क चॉकलेटमध्ये असलेले घटक हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही मदत करतात. त्यामुळे डार्क चॉकलेट खाणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
सुरकुत्या निघून जातात: (helps in ageing problems)
डार्क चॉकलेट सुरकुत्या घालवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवतात आणि त्वचा टाईट (tight skin) करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दूर होऊन चमक येते.
रक्ताभिसरण योग्य राखते:
डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुरळीत होते. एवढेच नाही तर चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्हनॉल रक्त गोठण्यासही प्रतिबंध करतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह बरोबर राहतो. (Benefits of eating dark chocolate know the fact )