मुंबई : बदाम हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी मानले जाते.बदाम मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे होतात. मात्र याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घेऊयात आरोग्याला कसे हानिकारक ठरतात जास्त बदाम.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन वाढण्याचा धोका
28 ग्रॅम बदामामध्ये जवळपास 164 कॅलरीज असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही इतर दैनंदिन आहारासोबत बदामाचे जास्त सेवन केले तर ते तुमच्या शरीराचे वजन वाढवू शकते. त्यामुळे दिवसभर बदामाचे फक्त ५ ते ६ तुकडे खाण्याचा प्रयत्न करा.


बद्धकोष्ठता 
बदामामध्ये भरपूर फायबर असते. बदामामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते. फायबर हे आरोग्यासाठी चांगले आहे परंतु जास्त प्रमाणात फायबर आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे जर तुम्ही जास्त बदाम खात असाल तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अतिसार, पोट फुगणे आणि ओटीपोटात क्रॅम्प देखील होऊ शकतात.


किडनी स्टोन होण्याचा धोका
बदाम आतड्यांमध्ये विरघळणारे ऑक्सलेट मुबलक प्रमाणात असतात. शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बदामाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.


ऍलर्जी समस्या
काही लोक बदाम किंवा काजू खाल्ल्यामुळे अॅलर्जीची तक्रार करतात. जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर बदाम खाणे टाळा. बदामाच्या सेवनामुळे काही लोकांना ओरल ऍलर्जी सिंड्रोम होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्हाला घसा खवखवणे, ओठांवर सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.