मुंबई : मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे हा प्रत्येक आईसमोरचा यक्षप्रश्न. कारण, मुलांच्या आवडीनिवडी प्रत्येक वेळी बदलत्या असतात. त्या सांभाळणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. अशा वेळी आईसमोर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक. म्हणूनच जाणून घ्या मुलांसाठी 'स्मार्ट' डाएट प्लॅन..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दही - मुलांचा डबा बनवताना त्यात दह्याचा नक्की वापर करा. यातील बॅक्टेरिया शरीरासाठी पोषख असतात. मुलांच्या अहारात दह्याचा समावेश असेल तर, ऋतूनुसार होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. या शिवाय सूज, संक्रमण, अॅलर्जी आदी समस्यांपासूनही सुटका होते. मुलांना दही पसंत नसेल तर, तुम्ही त्याऐवजी श्रखंडाचाही वापर करू शकता.


पालेभाज्या - भाजी म्हटले की, मुले पहिल्यांदा दूर पळतात. पण, हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न आणि सोडियम यांसारखी तत्वे असतात. मुलांना स्नॅक्सही पसंत असतात. त्यामुळे सॅंडविच, पराठा, रोल्स, व्हेज कबाब, बर्गर, टिक्की, मन्चुरीयन आदि गोष्टींमध्ये पालेभाज्यांचा वापर करून तुम्ही मुलांना देऊ शकता.


टोमॅटो  - टोमॅटो हे आरोग्यदायी असते. त्यात अॅंटीऑक्सीडेंट्स अधिक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे टोमॅंटोचाही वापर आहारात असावा. त्यासाठी सूप, सलाड, पास्ता, पिज्जा आदी गोष्टींमध्ये टोमॅटोचा वापर करता येतो.