मुंबई : चहा ही एक अशी गोष्ट आहे ज्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. प्रत्येकाला गरम चहा आवडतो... विशेषत: पावसाळ्यात. चहाच्या फायद्यांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. चहा आपल्याला रीफ्रेश करण्यासाठी तसेच दिवसभर ऊर्जा देण्यासाठी कार्य करते. आजही बहुतेक लोक नियमितपणे सकाळी उठल्याबरोबर दुधाचा चहा पितात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल की बाजारात चहाचे अनेक पर्याय आहेत. जे पर्याय आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. जर आपल्याला चहा पिण्याची आवड असेल तर आपण हे निरोगी पर्याय वापरुन पहा.


ग्रीन टी


ग्रीन टी जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे. यामध्ये कॅफेनची मात्रा फार कमी असते. ते कॅमेलिया सायनेन्सिसच्या पानांपासून बनते. या पानांना सुकवून शिजवलं जातं जेणेकरून ऑक्सिडेशन कमी होईल. हा चहा वेलची, तुळस, मध, लिंबू, आलं, पुदीनाच्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळतो. लठ्ठपणा कमी करण्याबरोबरच ग्रीन टी इतर आजारांपासूनही संरक्षण करते.


ग्रीन आईस टी


जर तुम्हाला गरमीच्या दिवसांत निरोगी आणि रीफ्रेश पेय पिण्याची इच्छा असेल तर तुम्ही ग्रीन आईस टी पिऊ शकता. यासाठी तुम्हाला पाणी उकळावं लागेल आणि ग्रीन टी बॅग मिक्स करावी. हा चहा एका ग्लासमध्ये घेऊन त्यात बर्फाचे तुकडे आणि काही पुदीन्याची पानं घाला. आपण साखर किंवा मधही वापरू शकता. हा चहा पिल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.


ब्लॅक टी


अजून एक लोकप्रिय पेय म्हणजे ब्लॅक टी. या टीसोबत तुम्ही आलं आणि वेलची वापरू शकता. ब्लॅक टीला जपानमध्ये रेड टी म्हणून ओळखलं जातं. हा टी प्यायल्याने डायबेटीज, कोलेस्ट्रॉल, किडनी स्टोन आणि इतर रोगांचा धोका कमी होतो.


हर्बल टी


कोरडे औषधी वनस्पती, फळं, फुलं, आले, पेपरमिंट, हिबिस्कस फुलं, लिंबाचा रस मिसळून हर्बल चहा बनवला जातो. या चहामध्ये चहाची पाने वापरली जात नाहीत. त्यामुळे यात कॅफिन नसतं. या चहाला औषधी वनस्पती आणि फुलांचा गंध येतो. नियमित चहापेक्षा हर्बल चहा पिणं अधिक फायदेशीर आहे.