मुंबई : ऑफिसमध्ये दुपारी येणाऱी झोप ही विशेषतः जर त्या वेळेस एखादी महत्त्वाची मिटिंग किंवा काम असेल तर अत्यंत त्रासदायक ठरते. अशावेळी आपण झोप घालवण्यासाठी आणि चटकन फ्रेश होण्यासाठी कॉफी घेणे पसंत करतो. परंतु, याव्यतिरिक ऑफिस मध्ये येणारी देखील दुपारची झोप घालवण्याचे काही हेल्दी आणि परिणामकारक पर्याय आहेत. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ऑफिसमध्ये दुपारची झोप आल्यास जागेवरून उठा, ऑफिस बाहेर पडा आणि जिने उतरा. परत चढा. the journal Physiology and Behavior च्या अभ्यासानुसार १० मिनिटे जिने चढल्या उतरल्यामुळे ५० मिलिग्रॅम कॅफेन घेण्यापेक्षा तुम्हाला अधिक फ्रेश, उत्साही वाटेल. 

  • लंच ब्रेकमध्ये ऑफिस बाहेर पडा आणि सूर्यप्रकाशात फिरा. the Journal of Clinical Sleep Medicine च्या अभ्यासानुसार सूर्यप्रकाशामुळे तुमचा मूड, जागरूकता आणि मेटॅबॉलिझम सुधारतो. परिणामी तुमचे आरोग्य चांगले होते. 

  • सायट्रस फळांचा वास एकाग्रता वाढवतो. कर्मचाऱ्यांना फ्रेश आणि फोकस्ड वाटावे म्हणून जपानमधील काही ऑफिसमध्ये ऑरेंज बेस्ड एयर फ्रेशनर्स वापरली जातात. 

  • संगीत ऐकल्याने कामाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसंच कामात लक्ष लागते, असे  Mindlab International च्या neuropsychologist आणि chairman Dr David Lewis यांनी आयोजित केलेल्या अभ्यासावरून दिसून आले आहे. 

  • कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण लाल रंगाकडे बघितल्याने तुमचे लक्ष, एकाग्रता वाढण्यास मदत होते. the University of British Columbia च्या अभ्यासानुसार लाल रंगामुळे सखोल लक्ष देऊन करण्याचे काम म्हणजेच प्रूफरिडींग आणि memory retrieval हे करण्यास चालना मिळते.  

  • थंड पाण्याने चेहरा व डोळे धुवा. यामुळे थकलेल्या डोळ्यांना आराम मिळेल आणि त्वचेचे पोर्स बंद होतील. म्हणून चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारा आणि मग चेहरा कोरडा करा.