कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक?
एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचं दुबईमध्ये अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.
दुबई : एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचं दुबईमध्ये अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.कार्डिअॅक अरेस्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कार्डिअॅक अरेस्ट हे हार्ट अटॅकपेक्षा वेगळं असतं. हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा नसांमध्ये ब्लॉकेजमुळे रक्तपुरवठा होण्यात अडचण येते. हृदय शरीराच्या इतर भागात रक्तपुरवठा सुरु असतो आणि व्यक्ती देखील शुद्धीत असतो.
कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्तपुरवठा अचानक बंद होतो. यामध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होतो आणि श्वासोच्छवासही बंद होतो.
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय ?
- इलेक्ट्रिकल सिग्नलच्या अडचणींमुळे शरीरात जेव्हा रक्त नाही पोहोचत. तेव्हा कार्डिअॅक अरेस्टचा धोका वाढतो.
- जेव्हा व्यक्तीचं शरीर रक्त पंप करणं बंद करतो तेव्हा डोक्यात ऑक्सीजनची कमतरता तयार होते.
- यानंतर व्यक्ती बेशुद्ध होतो आणि श्वास घेणं बंद होतं.
- कार्डिअॅक अरेस्ट अचानक होतो. शरीराकडून याबाबत कोणती पूर्णकल्पना देखील नाही मिळत.
- इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये गडबड झाल्याने हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड होतो.
- यामुळे हृद्याची पंप करण्य़ाची क्षमता कमी होते. त्यामुळे मेंदु, हृद्य आणि शरीरातील इतर गोष्टींना रक्त पोहोचणं अशक्य होऊन जातं.
- काही मिनिटात यामध्ये व्यक्ती बेहोश होतो. लगेचच जर उपचार नाही झाले तर कार्डिअॅक अरेस्टध्ये काही मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो.
कार्डिअॅक अरेस्टची कारणे :
- कोरोनरी हार्ट डिसीज
- ह्रदयविकाराचा झटका
- कार्डिओमायोपॅथी
- जन्मजात हृदयरोग
- हृदय झडप मध्ये समस्या
- हृदयाच्या स्नायूमध्ये जळजळ
- लाँग क्यू टी सिंड्रोमसारख्या व्याधी
- विद्युत शॉक
- जास्त औषधे घेणे
- रक्तसंक्रमणामुळे होणारे नुकसान
- पाण्यात बुडणे