Herbal Tea Recipes : चहाचे शौकीन असलेले बरेच लोक असतात जे की दिवसातून अनेक वेळा चहा पिऊ शकतात. चहा पिऊन अधिक ऊर्जावान वाटतात. चहा प्यायल्यानंतर ते कोणतेही काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. तुम्हाला माहित असेलच की, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण असे काही लोक असतात जे चहा अजिबात पीत नाहीत. पण आज आम्ही तुमच्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर अशा हर्बल चहाची माहिती देणार आहोत. त्याचबरोबर ही हर्बल चहा पियालाने त्वचा आणि केससांठी निरोगी असते. 


ग्रीन टी : ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत. तसेट ग्रीन टी बनवायला खूप सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये पाणी घ्यावे लागेल. नंतर त्यात ग्रीन टी टाका आणि चांगले उकळवा. उकळी आल्यावर गॅस बंद करा. तुमचा ग्रीन टी तयार आहे.


 पुदिन्याचा चहा : पुदिन्याच्या चहाचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते. हे प्यायल्याने त्वचेला थंडावा मिळतो. हे करण्यासाठी, तुम्हाला 8-10 पुदिन्याची पाने, काळी मिरी, काळे मीठ, 2 कप पाणी आवश्यक आहे. एका पॅनमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि नंतर पुदिन्याची पाने, काळी मिरी, काळे मीठ घालून काही वेळ उकळवा. तुमचा पुदिन्याचा चहा तयार आहे.


गुलाब चहा: रोज चहा पिण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. ते प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर असते. हे करण्यासाठी, तुम्हाला फक्त काही ताज्या गुलाबाच्या पाकळ्या, पाणी आणि मध आवश्यक आहे. सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने नीट धुवून घ्या. त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. मात्र या पाण्याला उकडी नाही काढयची हे फक्त लक्षात ठेवा. थोड्या वेळाने ते एका कपमध्ये गाळून त्यात मध टाकून सर्व्ह करा.