मुंबई : आधी अंड की कोंबडी हा वाद जसा वर्षानुवर्ष चालतो तसाच अंड शाकाहारी की  मांसाहारी हा प्रश्नदेखील वादग्रस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक शाकाहारी लोकं अंड मांसाहारी आहे असं समजून त्याचा आहारातील समावेश टाळतात. मग तुमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर काही शास्त्रज्ञांनी शोधलं आहे. पहा अंड शाकाहारी आहे की मांसाहारी याबद्दल वैज्ञानिक सत्य काय सांगतं ?  


मांसाहारी आणि शाकाहारी मागील लॉजिक काय ? 


अनेक शाकाहारींना अंड हे मांसाहारी वाटतं त्यामुळे ते खात नाहीत. त्यांना असं वाटतं जर कोंबडी अंड देते तर कोंबडी मांसाहारी म्हणजे अंडदेखील मांसाहारीच आहे. मग हा नियम दूधालाही लागू पडायला हवा. दूधही प्राणीच देतं ना ? 


अंड शाकाहारी 


अंड्यातून पिल्लू येतं  म्हणून तुम्ही त्याला मांसाहारी समजता. पण बाजारात मिळणारी अंडी ही अनफर्टीलाईजर आहेत. म्हणजे अशा अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही. त्यामुळे अंड्याला केवळ या कारणामुळे मांसाहारी समजणं चूक आहे. 


कसे ठाऊक झाले ? 


अंड्याला तीन लेअर असतात. पहिला लेअर हा कवच, दुसरा अंड्यातील पांढरा भाग आणि तिसरा म्हणजे पिवळा भाग. वैज्ञानिकांच्या शोधानुसार, अंड्यातील पांढरा भाग हा प्रोटीनयुक्त असतो. यामध्ये प्राण्याचा कोणताही समावेश नसतो. त्यामुळे वास्तवात अंड्यातील पांढरा भाग हा शाकाहारी असतो. .


अंड्यातील पिवळा भाग 


पांढर्‍या भागाप्रमाणेच अंड्यातील पिवळा भागदेखील प्रोटीनप्रमाणेच कोलेस्टेरॉल आणि फॅट्स यांनी युक्त असतो. कोंबडा आणि कोंबडी यांच्याअम्ध्ये मिलन झाल्यानंतर अंड्याची निर्मिती होते. त्यावेळेस त्यामध्ये गॅमीट सेल्स असतात. यामुळे अंड मांसाहारी होऊ शकते. 


कोंबडी अंड कसे देते ? 


कोंबडी सहा महिन्याची झाल्यानंतर प्रत्येक एक ते दीड दिवसांनंतर अंड देते. मात्र यासाठी प्रत्येक वेळेस तिचं कोंबड्याशी मिलन होण्याची गरज नसते. या अंड्यांनाच अनफर्टिलाईज्ड अंडी म्हणतात. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसर, ज्या अंड्यातून पिल्लू येणार नाही ती अंडी मांसाहारी समजण्याची काही गरज नाही. 


मग आता तुमच्या मनातील गैरसमज दूर करा. शाकाहारी की मांसाहारी हा वाद बाजूला ठेवा आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याचे फायदे समजून घेऊन आहारात त्याचा समावेश करा.