High cholesterol in children: लहान मुलांमध्ये वाढतेय कोलेस्ट्रॉकची समस्या, मग कमी करण्यासाठी करा `हे` उपाय
Child Health : सर्व मुलांचं (Children) कोलेस्टेरॉल 9 ते 11 वर्षं वयादरम्यान आणि त्यानंतर पुन्हा 17 ते 21 वर्षांदरम्यान तपासणं योग्य असतं. ज्या मुलांना डायबेटीस, लठ्ठपणा या समस्या असतात, तसंच कोलेस्टेरॉलची कौटुंबिक पार्श्वभूमी असते, अशा मुलांची कोलेस्टेरॉल तपासणी वयाच्या दुसऱ्या आणि 8व्या वर्षी करावी.
cholesterol in children: हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येने केवळ मोठ्या व्यक्तींनात त्रास होत नाही. लहान मुलांमध्येही कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असू शकते. लहानपणी हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर वाढत्या वयात आरोग्यसंदर्भातल धोकाही वाढतो. कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढल्यामुळे हृदय आणि शरीराच्या इतर भागांना रक्तपुरवठा होत नाही. कोलेस्ट्रॉललमुळे स्ट्रोक (stroke) येण्याचा धोकाही खूप वाढतो. दरम्यान लहान मुलांमध्ये कोणत्या कारणांमुळे कोलेस्ट्रॉकची समस्या वाढते तसेच त्यावर कोणते उपाय केले पाहिजे त्याबद्दल जाणून घ्या...
लहान मुलांमध्ये कोलेस्ट्रॉक लेव्हल वाढवण्याचे कारण
पौष्टिक नसलेले पदार्थ आणि जंक फूड खाल्ल्याने मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आजकाल मुलांची शारीरिक हालचाल फार कमी असते, बहुतांश मुलं ही मोबाईल, लॅपटॉपवर व्यस्त असतात आणि खेळण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. काही मुलांचे वजन जास्त असेल तर त्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.
मुलांमधील कोलेस्ट्रॉक कमी करण्यासाठी करा हे उपाय
- फॅट्स, सॅच्युरेडेट फॅट्स कमी असलेले पदार्थ मुलांना खायला द्यावेत.
- दररोज नियमितपणे व्यायाम करावा, सायकल चालवणे, पोहोणे, धावायला जाणे आणि बाहेर खेळणे, यामुळे शारीरिक हालचाल होते.
- मुलांचे वजन नियंत्रणात ठेवावे.
- पोषक तत्वं असलेला आहार मुलांना खाण्यास द्यावा
- सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटचा वापर करावा
वाचा: सावधान! आजपासून 'हे' 5 पदार्थ खाणं बंद करा, अन्यथा...
मुलांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलची कारणे - मुलांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल
मुख्यतः अस्वास्थ्यकर अन्न आणि बाहेरील अन्न ज्यामध्ये तेल आणि मीठ खूप जास्त असते.
आजच्या काळात मुले बाहेर खेळण्याऐवजी दिवसभर घरात फोन पाहत राहतात, त्यामुळे शारीरिक हालचाली खूप कमी झाल्या आहेत.
जर मुलाचे वजन जास्त असेल तर कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका जास्त असतो.
जर घरातील एखाद्याचे कोलेस्ट्रॉल खूप वाढले असेल तर यामुळे मुलाला देखील या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
अशी ओळखा हाय कोलेस्ट्रॉलची समस्या
लहान मुलांमधील रक्त तपासणीद्वारे कोलेस्टॉल तपासले जाऊ शकते. जर कुटुंबात हाय कोलेस्ट्ऱॉलची समस्या पालकांना असेल तर अशा मुलांनी तपासणी करणे आवश्यक ठरते. रक्त तपासणीच्या रिपोर्टवरुनच मुलांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी किती आहे हे समजू शकते.