High Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल
Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील.
Fruits To Reduce Cholesterol : राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे (Heart Attack) प्रमाण वाढले आहे. खराब कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण आहे. ( Health News in Marathi ) काही फळे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करता येते. हवामान, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलल्यामुळे हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढते. या दिवसात तेल आणि तुपापासून बनवलेल्या वस्तू जास्त खाल्ल्या जातात. अशा फॅटी गोष्टींमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे यापासून आपला बचाव करायचा असेल तर आहारात काही फळांचा समावेश करावा.
कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) जमा होऊन रक्ताभिसरणावर (Blood Circulation) परिणाम करते. त्यामुळे अनेकवेळा रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. हे हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचे कारण बनू शकते. उच्च कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आपण आहारात काही बदल केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरु शकते. काही फळांना आपल्या आहाराचा भाग बनवून कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते.
सफरचंद
सफरचंदमध्ये (Apple) पॉलिफेनॉल, अँटीऑक्सिडंट आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. हे शरीरातील चयापचय वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. सफरचंद हे चरबी मोठ्या प्रमाणात कमी करते. हे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर करण्याचे काम करते. त्यामुळे याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
पपई
पपई (Papaya) हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
संत्री आणि लिंबू
संत्री आणि लिंबू (Orange And Lemon) यांसारखी फळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दूर करतात.
पेर
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पेर अर्थात नाशपाती (Pear) खूप प्रभावी आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध नाशपाती खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. यामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
द्राक्षे
द्राक्षे (Grapes) ही पोषक तत्वांनी युक्त आहेत. त्यांच्या आपल्या आहाराचा समावेश केला पाहिजे. द्राक्षे कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करतात. द्राक्षांमध्ये असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)