मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अॅसिडीटीची समस्या डोकं वर काढते. अपुरी झोप, मसालेदार पदार्थ किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढतो. अशावेळी अ‍ॅन्टासिड किंवा गोळ्या घेऊन पित्ताचा त्रास कमी केला जातो. पचनक्रिया कमजोर असल्याने पोटात गॅस होतो आणि त्याचबरोबर अॅसिडीटी होऊ लागते.अॅसिडीटीवर नेहमी गोळ्या घेण्यापेक्षा या घरगुती उपायांनी ती दूर करा. त्याचबरोबर मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- अॅसिडीटीवर जेष्ठमध अतिशय फायदेशीर ठरते. याचे चूर्ण किंवा काढी बनवून प्यायल्यास आराम मिळतो. कडूलिंबाची सालही अॅसिडीटीवर उपयुक्त ठरते. रात्रभर कडूलिंबाची साल भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. 


- कोमट पाण्यात थोडी हळद, काळीमिरी पावडर आणि अर्धा लिंबू पिळून घाला. सकाळी हे पाणी प्यायल्याने आराम मिळेल. त्याचबरोबर आवळा, बेडीशेपचे चूर्ण बनवून सकाळ-संध्याकाळ अर्धा-अर्धा चमचा खा. 


- थोडीशी बेडीशेप पाण्यात उकळवा. पाणी थंड करुन ते प्या. याचा खूप फायदा होईल. त्रिफळा चूर्ण देखील अॅसिडीटीवर उपयुक्त ठरेल. हे देखील कोमट पाण्यासोबत घ्या.


- मनुके भिजवून ठेवा. सकाळी दूधात घालून उकळवा. त्यानंतर थंड करून ते दूध प्या. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने देखील अॅसिडीटीची समस्या दूर होते.