मुंबई : घाम येणं अगदी सामान्य आहे. पण काही लोकांना खूप जास्त घाम येतो. अतिरिक्त घाम येण्याची समस्या त्रासदायक ठरते. तुम्हाला पण येतो का खूप घाम? मग थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. खूप घाम येण्याची अनेक कारणे असतील. अनेकदा खूप जास्त औषधे घेतल्याने, स्थुलतेमुळे, ब्लड प्रेशर कमी झाल्याने किंवा मग थॉयराईडची समस्या असल्यास खूप घाम येऊ शकतो. पण यावर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. पाहुया कोणते आहेत ते उपाय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# अॅपल व्हिनेगरने ही समस्या दूर होऊ शकते. ज्या ठिकाणी अधिक घाम येतो तिथे हलक्या कोमट पाण्याने साफ करा आणि त्यानंतर तिथे सिरका लावा. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी उठल्यावर धुवा व त्यावर पावडर लावा. फायदा होईल.


# लिंबाचा रस, बेकिंग सोड्यात घालून लावा आणि १० मिनिटांनंतर धुवा.


# घाम येत असलेल्या ठिकाणी टॉमेटो लावल्याने फायदा होईल. टॉमेटो लावून १५ मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करा.


# काळा चहा घामाची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.


# मॅग्नेशियमने परिपूर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.