मुंबई : कोरोनामुळे (Corona) सर्वच काही ऑनलाईन झालंय. ऑफीसच्या कामापासून (Work To Home) ते शाळा सर्वच ऑनलाईन झालं आहे. कामानिमित्ताने अनेक जण हे कॉम्प्युटर (Computer), लॅपटॉप (Laptop) आणि मोबाईलवर (Mobile) असतात. यामुळे स्क्रीनवर आपला अधिक वेळ निघून जातो. त्यामुळे सर्वांच्याच स्क्रीन टाईमिंगमध्ये (Screen Time) वाढ झाली आहे. याचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम डोळ्यांवर (Eye Strain) परिणाम होतो. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी नक्की काय करावं, हे जाणून घेणार आहोत. (Home Remedies for Eye Health know details) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंड पाणी 


अनेक तास काम केल्याने डोळ्यांमध्ये वेदना आणि जळजळ होते. डोळ्यातील वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. उन्हाळ्यात कामादरम्यान ब्रेक घ्या. डोळे थंड पाण्याने धूवुन घ्या. असं केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल आणि तणावही कमी होण्यास मदत हातभार लागेल. 
 
तुळस आणि पुदीन्याचा वापर 


डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुळस आणि पुदीना वापरा. यासाठी रात्रभर पाण्यात तुळशी आणि पुदीन्याची पानं भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या पान्यात कापूस भिजवून ते डोळ्यावर ठेवा. याने डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि त्वचा तणावमुक्त राहील.  
 
गुलाब पाण्याचा उपयोग


डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुलाबपाणी वापरू शकता. एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळा. यानंतर त्यात कापूस घालून तो डोळ्यावर ठेवा. कापूस 5 मिनिटांनंतर काढा. दिवसातून तीन ते चार वेळा हे करू शकता. यामुळे डोळ्यांची जळजळ आणि थकवा कमी होण्यास मदत होईल. 


सूचना : उपाय करण्याआधी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
संबंधित बातम्या : 


डोळ्यांच्या आरोग्यासाठी या पदार्थांचे करा सेवन