नवी दिल्ली : आजकाल मोबाईल, लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या वाढलीये. लहान मुलेही सतत कंम्प्युटर अथवा टिव्हीसमोर बसून असतात. यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. काम तर तुम्ही बंद करु शकत नाही मात्र डोळ्यांची काळजी घेणे तर आपल्या हातात आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचे सेवन करा
हिरव्या भाजा जसे कोबी, पालक या भाज्यांचा आहारात समावेश करावा. यातील पोषकतत्वे मोतिबिंदूसारख्या आजारांपासून वाचवतात. यासोबतच मटार, ब्रोकलीही खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे.
पिस्ता, अक्रोड, बदाम सारख्या सुकामेव्यांचे सेवन करावे. यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड तसेच व्हिटामिन ई असते.
नॉनवेज खाणाऱ्यांनी नियमितपणे मासे खावेत. यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड डोळ्यांना सूज निर्माण होऊ देत नाही. डोळ्यांमध्ये कायम ओलावा राहतो.
लिंबू, संत्रीसारखी आंबट फळेही खावीत. यातील व्हिटामिन्समुळे मोतिबिंदूसारख्या आजाराचा धोका कमी होतो.
राजमासारख्या कडधान्याचा आहारात जरुर समावेश करावा. यात बायफ्लॅवोनाईड तसेच झिंक असते.
अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए असते ज्यामुळे डोळ्यांची नजर वाढते. रातआंधळेपणाचाही त्रास कमी होतो.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ई तसेच झिंक असल्याने डोळ्यांच्या आजारापासून रक्षण होते.
गाजर, टोमॅटो, स्ट्रॉबेर, मका, लाल आणि पिवळी सिमला मिरची यासारख्या रंगीबेरंगी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात.