मुंबई : आताच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आजकाल तरूण आणि शालेय विद्यार्थांमध्ये केस पांढरे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामागे तणाव, नैराश्य, आहारातील बदल इत्यादी करणे दिली जातात. यावर उत्तम पर्याय म्हणून प्रत्येक जण विविध रंगाचा वापर करतात. पण हे रासायनिक रंग केसांकरिता फार वाईट असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे पांढऱ्या केसांवर काही घरगुती उपाय 


- दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्यानं केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो. 


- नारळाच्या तेलामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि कडीपत्त्याची पान टाका. हे मिश्रण गरम करा. कडीपत्त्याची पानं काळी होईपर्यंत हे मिश्रण गरम करा. आंघोळ करायच्या १० मिनीटं आधी या तेलानं डोक्याची मालिश करा.


- पॅनमध्ये गरम पाणी घेऊन त्यात चहापत्ती टाका. पाणी थंड झाल्यावर या पाण्यानं केस धुवा. पण यानंतर शॅम्पू लावू नका. 


- आल्याचा किस दुधामध्ये टाकून त्याची घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट डोक्याला लावा, आणि १० मिनीटांनंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा ही डोक्याला लावा. 


- बदामाच्या तेलामध्ये आवळ्याचा रस टाकून डोक्याला रोज लावल्यानं पांढरे केस काळे होतात. 


- मेहंदी पावडर आणि दह्याचं समान मिश्रण एकत्र करून केसांचा मसाज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.