मुंबई: पावसाळा आणि किडे हे जणू समिकरणच. पावसाळ्यात किड्यांचे पेवच फुटलेले दिसते. पहावे तिकडे किडेच किडे दिसू लागतात. अशा वेळी हे किडे चावण्याचाही संभव असतो. किंबहुना चावतात. किडा चावल्यास शरीराला मोठा त्रास होतो. त्वचेला खाज सुटणे, त्वचा लालसर होणे, काही प्रमाणात सूज येणे असे प्रकार संभवतात. काही किडे हे विषारी असतात तर, काही अविषारी. कोणत्याही प्रकारचा किडा चावल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण, तोपर्यंत किडे चावल्यास तुम्ही घरगूती उपायही करू शकता.


बर्फाचा शेक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंगी, मधमाशी, किंवा इतर कोणता किडा चावल्यास त्वचा लालसर होते. काही प्रसंगात त्वचेला सूजही येते. अशा वेळी किडा चावल्याच्या ठिकाणी बर्फ ठेवा. बर्फाचा शेख घेतल्याने आराम मिळतो. तसेज, सूज कमी यायलाही मदत होते. कापडामध्ये बर्फाचे खडे घेऊन ते वेदनेच्या ठिकाणी २० मिनिटे ठेवा. वेदना कमी होण्यास मदत होते.


टूथपेस्ट


जर तुम्हाला मुंगी, मधमाशी किंवा तसाच एखादा किडा चावला तर तुमच्याकडे असलेली कोणतीही टुथपेस्ट त्या ठिकाणी लावा. आराम पडेल. टुथपेस्टमध्ये अँटीबॅक्टीरिअल आणि अँटीसेप्टीक गुण असतो. जो वेदना आणि सूज कमी करतो.


तुळशीची पाने


तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतो. ही पाने तुम्ही किडा चावल्याच्या ठिकाणी लावली तर, त्वचेची खाज आणि सूज कमी करण्यास मदत होते. तुळशीची पाने चोळून तो लेप १० मिनिटे वेदनेवर लावा. त्यामुळे इन्फेक्शनचा धोकाही टळतो.


मधही फायदेशीर


किडा चावल्यावर होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळवायचा असेल तर, मध फायदेशीर ठरते. किडा चावलेल्या जागेवर मध चोळा. मधातील औषधी गुणधर्म वेदना दूर करतो.