मुंबई : मासिक पाळी सुरु झाल्यानंतर महिलांना अनेक शारीरिक तक्रारींना सामोरं जाऊ शकतो. यामध्ये पोटदुखी, पाठदुखी, पायांमध्ये क्रॅम्स येणं या समस्या जाणवतात. मासिक पाळीदरम्यान महिलांच्या गर्भाशयातील स्नायू संकुचित होतात. यामुळे ओटीपोट दुखू लागतं. अशावेळी महिलांना मळमळ, डोकेदुखी, अतिसार आणि उलट्या यांचा त्रास होतो. काही महिलांना याचा फार त्रास सहन करावा लागतो. काही घरगुती उपचारांनी हा पिरीयड्स क्रॅम्प आणि होणारा त्रास नक्कीच कमी केला जाऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घेऊया मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठीचे घरगुती उपचार


हीट


आपल्या पोटावर गरम पाण्याची बॅग किंवा हीटिंग पॅड ठेवल्याने स्नायूंना आराम मिळाल्याने त्रास कमी होण्यास मदत मिळते. हीट ही गर्भाशयातील स्नायूंना आराम देण्यास मदत करत ज्यामुळे पिरीएड्समुळे होणारा त्रास कमी होतो.


जंक फूडपासून दूर रहा


मासिक पाळीच्या वेळी अनेकदा महिलाना चिप्स किंवा कुकीज खाण्याची इच्छा फार होते. मात्र या खाण्याने तुमचं दुखणं कमी होणार नाहीये. याशिवा शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी ओमेगा 3, फळं, नट्स, लीन प्रोटीन, भाज्या यांचा आहारात समावेश करावा.


व्यायाम


मासिक पाळी सुरु असताना केवळ सौम्य पद्धतीचा व्यायाम करावा. यामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग, पायी चालणं किंवा योगा करू शकता.


पुरेशी झोप घ्या


मासिक पाळीच्या काळात महिलांना आराम मिळणं फार गरजेचं आहे. अशावेळी सर्वाच चांगला मार्ग म्हणजे झोप घेणं. शांत झोपेमुळे महिलांना होणारा त्रास कमी होतो.


आलं आणि काळ्या मिरीचा चहा


आलं आणि काळ्या मिरीचा काढा मासिक पाळीच्या त्रासाला कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. एक कप पाणी उकळा यामध्ये आल्याचे बारीक तुकडे करून त्यामध्ये काळी मिर्ची घाला. 5 मिनिटं उकळून हा चहा गरम असताना प्या.


जीरं


मासिक पाळीत वेदना कमी करण्यासाठी जिऱ्याचा हर्बल चहा बनवू शकता. जिऱ्यामध्ये अँटी-स्पास्मोडिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देण्यास उपयुक्त ठरू शकतात.