Puffy Eyes ची समस्या दूर करतील `हे` घरगुती उपाय!
सकाळी उठल्यावर अनेक लोकांचे डोळे सुजलेले, फुगलेले दिसतात.
मुंबई : सकाळी उठल्यावर अनेक लोकांचे डोळे सुजलेले, फुगलेले दिसतात. त्यास पफी आईज असे म्हणतात. त्यामुळे तुमचा लूक बदलतो. सौंदर्यात बाधा निर्माण होते. पफी आईजची समस्या रात्री उशिरा झोपल्याने, ताण तणावामुळे, चुकीच्या आहारामुळे, तासंतास कॅम्प्युटर, मोबाईलसमोर बसल्याने होते. या समस्येने तुम्हीही त्रासलेले आहात का? मग या घरगुती उपायांनी तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता.
# पफी आईजची समस्या असल्यास सकाळी उठून चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोड्यात एक चमचा थंड पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून ५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्याला ऑईल फ्रि क्रिम लावा.
# पफी आईजपासून सुटका मिळवण्यासाठी चिमूटभर काळीमिरी पावडर, एक चमचा कॉफी, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि थोडेसे पाणी घालून मास्क तयार करा. हा मास्क डोळ्यांच्या खाली लावा. १० मिनिटांनंतर कपड्याने किंवा टिशूने नीट पुसून घ्या. पफी आईजसोबतच डार्क सर्कल्सची समस्याही दूर होण्यास मदत होईल.