मुंबई : बदललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल थायरॉईडची समस्या सामान्य झाली आहे. यासाठी आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. पण यावर तुम्ही काही घरगुती उपचारही करु शकता. त्यामुळे थायरॉईडचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल. तर जाणून घेऊया काही घरगुती उपाय...


आलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलं घरात सहज उपलब्ध होतं. आल्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे पोषकघटक असल्यामुळे थायरॉईडची समस्या आटोक्यात आणण्यास मदत होते. आल्यातील अॅंटी इंफलेमेटरी गुणधर्मा थायरॉईडची समस्या वाढू देत नाहीत आणि त्याचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात.


दही आणि दूधाचे सेवन


थायरॉईडने त्रासलेल्या लोकांना दही आणि दूधाचे अधिक सेवन करायला हवे. दूध आणि दह्यातील कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॉमिन्स थायरॉईडने ग्रासलेल्यांना विशेषतः पुरुषांना स्वस्थ ठेवण्यास मदत करतात. 


ज्येष्ठमध


थायरॉईडने ग्रासलेल्यांना थकवा खूप लवकर येतो. यासाठी ज्येष्ठमध अतिशय फायदेशीर ठरते. ज्येष्ठमध थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारतात. शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा येत नाही. त्याचबरोबर कॅन्सरलाही प्रतिबंध करण्यास ज्येष्ठमध फायदेशीर ठरते. 


गहू आणि ज्वारी


थायरॉईड वाढण्यास आळा घालण्यासाठी गहू आणि ज्वारी फायदेशीर ठरते. थायरॉईडची समस्या दूर करण्याचा गहू आणि ज्वारी हा अत्यंत उत्तम व नैसर्गिक उपाय आहे. याशिवाय सायनस, उच्च रक्तदाब आणि अॅनेमिया (रक्ताची कमतरता) यांसारख्या समस्या रोखण्याचा हा परिणामकारक उपाय आहे.