मुंबई :  कोणताही पदार्थ खाल्ले तर अनेकांच्या हिरड्यांमध्ये आणि दातात अडकतात. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. ही समस्या अनेकांना असते. यावर आज आम्ही तुम्हाला पाच उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तोंडातून दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. काही वेळा तोंडाच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणाऱ्यांनाही ही समस्या उद्भवू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आणि तोंडाला हायड्रेट ठेवणे हा त्यापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. असं तज्ज्ञांचं आहे. अनेक उपाय करून देखील तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या. 


टॉन्सिल स्टोन
तुमच्या टॉन्सिलमध्ये छोटे पांढरे डाग लपलेले असल्याने ते क्वचितच दिसतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी येते कारण ते जीवाणूंची पैदास करतात. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही माउथवॉश, कोमट मिठाच्या पाण्याने चुळ भरल्यास दुर्गंधी येणार नाही. 


नाश्ता सोडू नका
एका संशोधनातून समोर आलं आहे की, जे लोक न्याहारी करत नाहीत त्यांना जास्त दुर्गंधी येऊ शकते. दुर्गंधी आणि मजबूत दातांसाठी, न्याहारीमध्ये कमी साखर असलेल्या गोष्टी खा. सफरचंद, दही, दूध आणि सर्व प्रकारच्या फायबर युक्त गोष्टी खा.


नाकातून श्वास घ्या
तोंडातून श्वास घेतल्याने ही समस्या उद्भवू शकते कारण असं केल्यास लाळेचे उत्पादन थांबवते. म्हणून, नाकातून श्वास घेणे हा एक चांगला पर्याय आहे. तोंडाने श्वास घेतल्याने हिरड्यांचे आजार, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते.


जेवणानंतर पाणी प्या
कडक पदार्थ खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी येऊ शकते कारण त्यांची रसायने तुमच्या रक्तप्रवाहातून तुमच्या फुफ्फुसात जातात आणि तुमच्या श्वासाद्वारे बाहेर पडतात. मसालेदार जेवणानंतर साखरमुक्त च्युइंगम घ्या. जेवण करण्यापूर्वी आणि नंतर पाणी प्या.


टूथब्रश
टूथब्रश निवडताना त्याचे धागे मऊ किंवा मध्यम बघून घ्यावा. फार कडक धागे असलेला ब्रश टाळावा.


टिप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. वरील उपाय केल्यास समस्या दूर होण्याचा दावा 'झी 24 तास' करच नाही. म्हणून डॉक्टरांना सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.