डोळ्यांखालील काळे डाग नाहीसे करण्याचे रामबाण उपाय
आताच्या युगात फक्त महिलाच नाही तर पुरूष देखील आपल्या त्वेचेची काळजी घेत असतात.
मुंबई : आताच्या युगात फक्त महिलाच नाही तर पुरूष देखील आपल्या त्वेचेची काळजी घेत असतात. आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्याहूनही अधिक नाजूक आणि पातळ त्वचा डोळ्यांच्या भोवतालची असते. बदलत्या जीवनशैली त्याचप्रमाणे कमी झोप, संगणकावर सतत काम करून, मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर थकवा याचा परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो आणि डोळ्यांखाली काळे घेरे तयार होतात.
डोळ्यांखाली काळे घेरे आल्यास करा हे उपाय
- एक चमचा गुलाब जल आणि काकडीच्या रसाचे मिश्रण करावे. कापसाने डोळ्यांखाली लावावे.
- अर्धा चमचा काकडीचा रस, दोन थेंब मध, बटाट्याचा रस आणि बदामाचे तेल व्यवस्थित मिसळून घ्या. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण डोळ्यांखाली लावल्याने फरक पडतो.
- किसलेला बटाट्याने डोळ्यांखाली हल्क्या हाताने मसाज करावी. नियमित असे केल्यास समस्या दूर होईल.
- बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करुन लावावी.
- मध आणि बदामतेल सम प्रमाणात घ्या. याला व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाचा नक्कीच फायदा होतो.