या घरगुती उपायांनी दातांवरील काळे डाग होतील दूर!
गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे पडू लागतात.
मुंबई : गुटखा, मावा खाण्याने किंवा दातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे दातांचा रंग बदलू लागतो आणि हळूहळू दात काळे पडू लागतात. त्यामुळे अनेकदा लोकांशी संवाद साधणे, हसणे कठीण होते. त्यात भर म्हणजे दातांवर पडलेले डाग इतके जिद्दी असतात की, ते सहज निघत नाहीत. त्यामुळे अनेकदा थट्टेला बळी पडावे लागते. पण तुम्हाला माहित आहे का? यावर काही घरगुती उपाय आहेत. ज्यामुळे हे डाग तुम्ही अगदी सहज काढू शकता. जाणून घेऊया हे उपाय...
#1. सर्वप्रथम दिवसातून दोनदा दात घासण्याची आणि जीभ स्वच्छ करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे दात स्वच्छ होऊन चमकदार होण्यास मदत होईल.
#2. काहीही खाल्यानंतर चूळ भरा. विशेषतः गुटखा खाल्यावर दात बोटाने घासून साफ करा. चूळ भरा. त्यामुळे दातांवर डाग जमा होणार नाहीत.
#3. दातांचा वरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे दातांवर डाग जमा होणार नाहीत.
#4. याशिवाय ब्रश करताना दात चमकण्यासाठी दातांवर बेकींग पावडर घासा. त्यामुळे तंबाखू, गुटख्याचे डाग कमी होण्यास मदत होईल.
#5. दातांवरील जिद्दी डाग घालवण्यासाठी तुम्ही गाजर देखील वापरु शकता. रोज गाजर खाल्याने दात स्वच्छ राहतात. गाजरातील तंतू दातांमधील घाण साफ करण्यास मदत करतात.