मुंबई : कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक जोरदार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. पण आपण देखील या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणं तितकचं गरजेच आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्की वाचा. पण आहारात या पदार्थंचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आवळा
आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, ऍन्टी-ऑक्सिडेंट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो.


दालचीनी
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचीनी अत्यंत उपयुक्त आहे. दालचीनीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट्स आणि ऍन्टी-बॅक्टिरीअल गुण असतात. जे शरीरासाठी उपयुक्त ठरतात. 


लवंग
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्‍शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.  


हळदीयुक्त दूध
सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.