मुंबई : संध्याकाळची वेळ झाली की डासांचा प्रादुर्भाव वाढतो. डास चावल्यानंतर काही वेळातच अंगावर निशाण उमटते. डास चावल्यानंतर होणारी जळजळ, खाज, वेदना यामुळे त्रास अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. काही वेळेस यामुळे त्वचा अधिक शुष्क होण्याचा धोका असतो. सतत खाजवल्याने रक्तप्रवाह होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. लिंबू -  


लिंबाचा रस काढल्यानंतर त्याची साल डास चावलेल्या जागी लावा. या उपायामुळे खाज येणार नाही सोबतच निशाणही कमी होते.  


2. कांदा -


डास चावल्यामुळे होणारी जळजळ, निशाण कमी करण्यासाठी कांद्याचा त्यावर वापर करा. कांदा त्वचेवर लावल्याने त्रास कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पाण्याने तो भाग स्वच्छ धुवून टाका. 


3. बेकिंग सोडा - 


ज्या भागावर डास चावला आहे त्यावर बेकिंग पावडर आणि पाण्याची पेस्ट बनवून लावा. डास चावलेल्या भागावर बेकिंग सोड्याची पेस्ट लावल्याने डास  चावल्याचे निशाण कमी होण्यास मदत होते.  


4. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर - 


डास चावल्यामुळे त्रास होत असलेल्या जागेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने आराम मिळू शकतो. यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही. 


5. दिव्यातील तेल - 


दिवा जळल्यानंतर त्यामधील तेल त्वचेवर लावल्याने आराम मिळू शकतो. यामुळे जळजळ, खाज हा त्रास कमी होण्यास मदत होते.