मुंबई : अनेकांना सतत तोंड येण्याची समस्या असते. त्यामुळे जेवतांना अनेकांना त्रास होतो. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येण्याचं प्रमाण अधिक असतं. पण यावर काय उपाय कराल जाणून घ्या...


तोंड येण्याची काही कारणे:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. जास्त मलासेदार पदार्थ खाणे.
२. जास्त गरम पदार्थ किंवा ड्रिंकचे सेवन करणे.
३. दातांची अस्वच्छता
४. जास्त अ‍ॅसिडिक पदार्थांचं सेवन
५. व्हिटॅमिन बी आणि आर्यनचे संतुलन बिघडणे
६. अ‍ॅलर्जी असलेल्या पदार्थांचं सेवन


काही जणांना ताप आल्यावरही तोंड येतं. तर महिलांना मासिक पाळी दरम्यान तोंड येण्याची समस्या असते. 


काय आहेत घरगुती उपाय ?


१) तोंड आल्यास एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ घालून ते पाणी खोड्या वेळ तोंडात धरुन ठेवा.


२) तुळशीचे दोन-तीन पाने चावून त्याचा रस प्या.


३) विड्याच्या पानाचं चूर्ण तयार करुन त्यात थोडं मध मिसळून ते फोडीवर लावावे.


४) विड्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तुप घालून फोडीवर लावावे.


५) लिंबाचा रस आणि मध एकत्र करुन त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.


६) तोंड येण्याची समस्या ही पोट स्वच्छ होत नसल्याने अधिक प्रमाणात होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे.