मुंबई : नियमित ब्रश करूनही अनेकांमध्ये दात खराब होण्याचा धोका असतो. दातांवरील इनॅमल खराब होणं, प्लागमुळे तोंडात दुर्गंधी निर्माण होणं, बॅक्टेरिया वाढणं हे त्रास बळावतात. 


दातांना कीड लागू नये म्हणून काय कराल ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दातांना कीड लागू नये म्हणून त्याची नियमित काळजी घेणं आवश्यक आहे. दातांना कीड लागल्यास कांद्याचे बीज फायदेशीर ठरतात. चिलममध्ये भरून त्यातून हवा बाहेर सोडल्याप्रमाणे करा. मात्र त्याकरिता आतामध्ये कांद्याची बीज भरा. कांयाच्या धुरामुळे दातांमधील कीड नष्ट होण्यास मदत होते. 


दाताची कीड दूर करण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. सोललेला कांदा बारीक चिरावा. यामध्ये थोडं तेल मिसळा. त्यावर छिद्र केलेलं एक मडकं ठेवा. त्यामधील धूर पाईपच्या मदतीने आत घ्या. कांद्याचा धूर कीड नष्ट करण्यास मदत होते.  


हिंगाच्या मदतीने कीड नष्ट करण्यास मदत होते. हिंग पाण्यात मिसळून उकळा. या पाण्याला थोडं थंड करा. त्यानंतर गुळण्या करा. या पाण्यामुळे दातांना कीड लागण्याचा धोका कमी होतो. सोबतच दातदुखीचा त्रासही कमी होतो.