मुंबई : सुडौल शरीर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे आणि वाढते वजनचं अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. पण वाढलेले वजन कमी करणे मोठे आव्हान ठरत आहे. स्थुलता, पोटावरील अतिरीक्त चरबी ही अनेक मुलींची समस्या आहे. त्यामुळे सुंदर दिसण्याची समस्याही भंग पावते. इतकंच नाही तर आरोग्याचा समस्याही उद्भवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थुलता, वाढलेले पोट ही आजच्या तरुणाईची समस्या आहे. त्यासाठी अनेकजण जीम लावतात, व्यायाम करतात, महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण अनेकदा त्यांना वजन कमी करण्यात यश येत नाही. किंवा त्यात सातत्य राखणे अनेकांना जमत नाही. पण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल...


  • पोटावरील चरबी कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे खोबरेल तेल. खोबरेल तेलात नवरत्न तेल किंवा विक्स घालून एक मिश्रण तायर करा आणि त्या तेलाने पोटाला मालिश करा.

  • मध औषधी आहे, हे आपण जाणतो. मग रोज सकाळी उठल्यावर लिंबू आणि मधाचे मिश्रण पाण्यात घालून ते प्या. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल. याव्यतिरिक्त ५ ग्रॅम जिरा पावडर आणि मधाचे काही थेंब पाण्यात घालून प्या. चरबी लवकर कमी होईल. 

  • स्थूल व्यक्तीसाठी लिंबू एक वरदान ठरेल. रोज आहारात लिंबाचा समावेश केल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. लिंबामुळे अन्नाचे योग्य पचन होते. म्हणून आजपासूनच लिंबाचे सेवन सुरू करा.