डोक्यातील कोंडा दूर करेल साखर
डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी सोपा उपाय
मुंबई : डोक्यात कोंडा होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येत आहे. ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर त्वरित उपाय करणे फार महत्वाचे असते. खूप अधिक प्रमाणात डोक्यात कोंडा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही घरगुती उपाय करूनही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
डोक्यातील स्किन मृत पावण्याची प्रक्रिया लवकर होत असल्यामुळे ही समस्या उद्भवते. पाणी कमी प्यायल्याने देखील ही समस्या उद्भवते.
साखर आणि कोरफड
डोक्यात कोंडा होत असेल तर साखर आणि कोरफड मधील जेल एकत्र करून डोक्याच्या स्किन वर लावावे. कोरफड आणि आणि साखर डोक्यातील मृतस्किन काढण्यास मदत करते.
साखर बारीक करून ती कोरफडच्या जेलमध्ये मिसळून घ्यावी. दोघांचं मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण डोक्याच्या स्किनवर लावावे. 30 मिनिटे झाल्यानंतर डोकं स्वच्छ धुवावे. केसांची वाढ करण्यासाठी देखील हे मदत करतं.